रिलायन्स जिओने बाजारात दाखल होत स्पर्धक कंपन्यांची दाणादाण उडवली आहे. सुरुवातीला मोफत कॉलिंग मग मोफत इंटरनेट आणि त्यानंतर मोफत मोबाईल फोन बाजारात दाखल करत जिओने धमाका उडवला होता. काही दिवसांपूर्वीच जिओने आपला Jio phone 2 दाखल करत असल्याचे सांगितले. त्यानंतर आता कंपनीने या फोनचा सेल जाहीर केला आहे. या फ्लॅश सेलमध्ये हा मोबाईल अतिशय स्वस्तात मस्त खरेदी करता येणार आहे. दुपारी १२ वादता सुरु होणाऱ्या या सेलमध्ये Jio phone 2 अवघ्या २९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. हा फ्लॅशसेल असल्यामुळे मर्यादीत फोनचीच विक्री होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पहिल्यांदा नोंदणी करणाऱ्याला फोनसाठी प्राधान्य दिलं जाईल.

Qwerty कीपॅड, यू ट्यूब, व्हॉट्स अॅप आणि फेसबुकचे ‘इनबिल्ट’ अॅप, हॉरिझेंटल डिस्प्ले ही या नव्या फोनची वैशिष्ट्ये आहेत. दिसायला हा फोन जुन्या ब्लॅकबेरी फोनप्रमाणे आहे. फोनमध्ये ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आलं आहे, मेमरी कार्डद्वारे स्टोरेज १२८ जीबीपर्यंत वाढवता येईल. या ४जी फोनमध्ये २००० एमएएच बॅटरी असून त्यामुळे १४ तासांचा टॉकटाइम बॅकअप मिळेल असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, एनएफसी आणि एफएम रेडिओ यांसारखे कनेक्टिविटी फिचर्स देण्यात आले आहेत.

१० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजल्यापासून Jio.com आणि माय जिओ अॅपवर सेलला सुरूवात होईल. फोन खरेदी करण्यासाठी संकेतस्थळावर गेल्यानंतर Get Now पर्यायावर क्लिक करावं आणि फोनसाठी नोंदणी करावी. त्यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक, पत्ता आदी माहिती द्यावी लागेल. फोन खरेदी कऱण्यासाठी कॅश ऑन डिलीव्हरीचा पर्याय मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला नेट बॅंकिंग अथवा डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करावं लागेल. फोनची डिलीव्हरी केव्हापासून सुरू होणार याबाबत जिओकडून माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे तुम्ही स्वस्तात मस्त फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही निश्चितच चांगली संधी आहे.