News Flash

नववर्षाचं गिफ्ट दिल्यानंतर आता Reliance Jio ने ग्राहकांना दिला झटका

फ्री कॉलिंगच्या गिफ्टनंतर जिओने दिला युजर्सना झटका...

1 जानेवारीपासून देशात सर्व नेटवर्कसाठी IUC म्हणजेच Interconnect Usage Charges पूर्णपणे बंद करत जिओने पुन्हा एकदा कॉलिंग सेवा विनामूल्य केली. नववर्षात आपल्या ग्राहकांना फ्री कॉलिंगचं गिफ्ट दिल्यानंतर आता कंपनीने आपल्या ग्राहकांना एक झटका दिलाय. Reliance Jio ने आपल्या टॉक टाइम प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फ्री डेटाची ऑफर बंद केली आहे. याशिवाय जिओच्या 4G डेटा व्हाउचर्समध्येही आता व्हॉइस कॉलिंगची सेवा मिळणार नाही.

(200 पेक्षा कमी किंमतीत 42GB पर्यंत डेटा, Reliance Jio चे बेस्ट प्रिपेड प्लॅन्स)

वर्ष 2020 च्या सुरूवातीला जिओने आपल्या टॉक टाइम प्लॅनसोबत 100GB पर्यंत फ्री डेटा व्हाउचर आणि 4G डेटा व्हाउचर्ससोबत नॉन-जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे देण्याची घोषणा केली होती. जिओकडून आतापर्यंत ऑफ-नेट कॉलवर 10 रुपये खर्च करणाऱ्या युजर्सना 1 जीबी डेटा दिला जायचा. म्हणजे 1 हजार रुपयांच्या टॉक टाइम प्लॅनसोबत 100 जीबी फ्री डेटा दिला जायचा. पण आता कंपनीने प्रत्येक नेटवर्कवर व्हॉइस कॉलिंग फ्री केल्यामुळे फ्री डेटा व्हाउचर बंद केले आहेत.

जिओकडे 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये आणि 1 हजार रुपयांपर्यंतचे टॉक टाइम प्लॅन आहेत. यामध्ये 100 जीबीपर्यंत मोफत डेटा मिळतो. पण आता हे प्लॅन्स केवळ टॉक टाइमसह येतील. याशिवाय कंपनीने 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये आणि 401 रुपयांच्या जिओ 4G डेटा व्हाउचर्समध्येही बदल केला आहे.

4G डेटा व्हाउचरमध्ये नाही मिळणार कॉलिंग सुविधा :-
11 रुपयांच्या 4G डेटा व्हाउचरमध्ये आतापर्यंत नॉन-जिओ नेटवर्कवर 75 मिनिटे, तर 101 रुपयांच्या पॅकमध्ये 1 हजार मिनिटे मिळायची. याशिवाय या डेटा व्हाउचर्समध्ये डबल डेटाचा फायदाही मिळायचा. पहिले 11 रुपयांचा 4G डेटा व्हाउचर प्लॅन 400MB डेटा बेनिफिट्ससह यायचा पण आता यामध्ये 800MB डेटा मिळत आहे. कंपनीने जिओ आपल्या 4G डेटा वाउचर्सच्या डेटा बेनिफिटमध्ये बदल केलेला नाही, पण नॉन-जिओ कॉलिंग बेनिफिट हटवले आहेत. म्हणजे आता या 4G डेटा व्हाउचर्समध्ये व्हॉइस कॉलिंगचे फायदे मिळणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 12:01 pm

Web Title: reliance jio removes complimentary data vouchers with talk time plans check details sas 89
Next Stories
1 अ‍ॅन्जिओप्लास्टी झाल्यानंतर पुढे काय?
2 IndiGo चा खुलासा, डिसेंबरमध्ये हॅक झालं होतं सर्व्हर; डॉक्युमेंट्स चोरल्याची भीती
3 तुम्हीही UPI द्वारे पेमेंट करतात का? NPCI ने दिली ‘गुड न्यूज’
Just Now!
X