News Flash

प्रजासत्ताक दिनानिमित्तानं जिओनं आणली भन्नाट ऑफर!

पाहा जिओचे नवीन डाटा प्लान

प्रजासत्ताक दिनानिमित्तानं रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर आणली आहे. त्यामुळे जिओच्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक डाटा मिळणार आहे. यासाठी ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. नव्या ऑफरनुसार ग्राहकांना १ जीबी डाटाऐवजी १.५ जीबी डाटा आणि १.५ डाटा प्लान असणाऱ्यांना २ जीबी डाटा मिळणार आहे.काही दिवसांपूर्वी एअरटेलनं रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी नवीन डाटा प्लान आणला होता. एअरटेलनं आपला १ जीबी डाटा प्लान हा १.४ जीबी केला होता. पण, जिओनं आपला प्लान लाँच करून एअरटेलला पुन्हा एकदा टक्कर दिली आहे. जिओचा हा प्लान २६ जानेवारी २०१८ पासून सुरू होणार आहे.

वाचा : एअरटेल देणार ३९९ रुपयांत ८४ दिवस १ जीबी डेटा

जिओचा सर्वात स्वस्त प्लान हा ९८ रुपयांचा असणार आहे. तर सर्वात महागडा प्लान हा ४९८ रुपयांचा आहे. ९८ रुपयांच्या प्लान मध्ये ग्राहकांना २ जीबी डेटा २८ दिवसांसाठी वापरता येणार आहे. याव्यतिरिक्त जिओ युजर्सना फ्री अनलिमिटेड व्हॉइस कॉल, एसएमएस आणि जिओ सूट अॅप वापरण्याची मूभा देण्यात आली आहे. या प्रत्येक प्लानमध्ये पूर्वीपेक्षा अधिक डाटा ग्राहाकांना मिळणार आहे. ५० टक्के अतिरिक्त डाटा देऊन जिओनं ग्राहकांना प्रजासत्ताक दिनाची भेट दिलीय असंच म्हणावं लागेल.

पाहा जिओचे नवे प्लान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 10:34 am

Web Title: reliance jio republic day offer plan
टॅग : Reliance Jio
Next Stories
1 हसत खेळत कसरत : ‘शोल्डर श्रग्ज’
2 नैराश्याने कर्करुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक
3 ७३ टक्के संपत्ती देशातील १ टक्के श्रीमंतांकडे
Just Now!
X