एअरटेल आणि व्होडाफोन या टेलिकॉम कंपन्यांप्रमाणे रिलायन्स जिओकडेही दररोज 2 जीबी डेटा देणारे अनेक प्लॅन्स आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या दररोज 2 जीबी डेटा देणाऱ्या प्रीपेड प्लॅनबाबत सांगणार आहोत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 जीबी डेटाची किंमत 4 रुपयांपेक्षाही कमी पडते.

रिलायन्स जिओचा 444 रुपयांचा प्लॅन :-
रिलायन्स जिओच्या 444 रुपयांच्या प्लॅनमध्ये तसं पाहायला गेलं तर तुम्हाला डेटासाठी खूप कमी पैसे मोजावे लागतात. या प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा मिळतो. म्हणजे ५६ दिवसांसाठी ग्राहकांना एकूण 112 जीबी डेटा मिळतो. 444 रुपयांमध्ये 112 जीबी डेटा म्हणजेच तुम्हाला 1 जीबी डेटासाठी चार रुपयांपेक्षाही कमी पैसे (३.९) मोजावे लागतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटाशिवाय जिओ टू जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचाही फायदा मिळतो. तर, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 2000 नॉन जिओ मिनिटे मिळतात. तसेच, या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शनही मिळते. पण, डेटाच्या बाबतीत हा जिओचा दुसरा सर्वात स्वस्त प्लॅन आहे.

यापेक्षा स्वस्त डेटा तुम्हाला 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये मळतो. या प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. म्हणजे 84 दिवसांसाठी एकूण 168 GB डेटा मिळतो. याचाच अर्थ तुम्हाला 1 जीबी डेटासाठी साधारण फक्त 3.5 रुपये मोजावे लागतात. यामध्येही ग्राहकांना जिओ टू जिओ नेटवर्कवर कॉलिंग अनलिमिटेड मिळते. तर, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3000 नॉन जिओ मिनिटे मिळतात. तसेच, 444 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे यामध्येही युजर्सना दररोज 100 एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.