स्वस्त रिचार्ज प्लॅन्स, कमी किंमतीत जास्त डेटा आणि कॉलिंग ऑफर दिल्याने टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या युजर्सची संख्या सतत वाढतेय. अलिकडेच कंपनीने आपली वेबसाइटही अपडेट केली, यासोबतच कंपनीने आपल्या प्रिपेड प्लॅन्सची विविध श्रेणीमध्ये विभागणी केली आहे. कंपनीने सुपर व्हॅल्यू, बेस्ट सेलर्स आणि ट्रेंडिंग अशा तीन श्रेणींमध्ये प्लॅन्सची विभागणी केली आहे. आज आपण 555 रुपयांच्या जिओच्या ‘बेस्ट सेलर’ प्लॅनबाबत जाणून घेणार आहोत…

555 रुपयांचा जिओ बेस्ट सेलर प्लॅन :-
जिओच्या या बेस्ट सेलर प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1.5 जीबी हाय-स्पीड डेटा वापरण्यास मिळतो. 555 रुपयांच्या या प्लॅची व्हॅलिडिटी 84 दिवस आहे, म्हणजे 84 दिवसांसाठी एकूण 126 जीबी डेटा मिळतो. शिवाय दिवसाची 1.5 जीबी डेटा मर्यादा संपल्यानंतर 64 Kbps इतक्या कमी स्पीडने डेटाचा वापर करता येतो. याशिवाय देशभरात अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंगची सुविधाही या प्लॅनमध्ये आहे. यासोबत दररोज 100 SMS मिळतात. तसेच, Jio अ‍ॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही या प्लॅनमध्ये मिळतं. यात जिओटीव्ही, जिओसिनेमा, जिओ न्यूज, जिओसिक्युरिटी आणि जिओ क्लाउड यांसारख्या सेवा मोफत वापरता येतील.

199 रुपयांचा जिओ बेस्ट सेलर प्लॅन :-
जिओच्या बेस्ट सेलर प्लॅन्सच्या यादीत 199 रुपयांच्या प्लॅनचाही समावेश आहे. जिओच्या 199 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून यात दररोज 1.5 GB हाय-स्पीड डेटा वापरण्यास मिळतो. म्हणजे एकूण 42 जीबी डेटाचा फायदा युजर्सना होतो. रोजची डेटा मर्यादा संपल्यानंतर 64Kbps या कमी स्पीडने डेटा वापरता येतो. शिवाय जिओच्या या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर देशभरात फ्री व्हॉइस कॉलिंगची (लोकल आणि एसटीडी) सेवाही मिळते. तसेच, दररोज 100 एसएमएस आणि जिओटीव्ही, जिओसिनेमा, जिओ न्यूज, जिओसिक्युरिटी आणि जिओ क्लाउड यांसारख्या सेवाही मोफत वापरता येतात.

जिओचे अन्य बेस्ट सेलर प्लॅन :-
दरम्यान, जिओच्या बेस्ट सेलर प्लॅन्सच्या यादीत 555 आणि 199 रुपयांच्या प्लॅनशिवाय, 599 रुपये आणि 2 हजार 399 रुपयांचे अन्य प्लॅन्सही आहेत. 2 हजार 399 रुपयांच्या प्लॅनची वैधता 365 दिवस असून यात दररोज 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल आणि मोफत 100 एसएमएस यांसारख्या सेवा मिळतात.