News Flash

Jio ग्राहकांना मिळणार भन्नाट ऑफर, कंपनीने ‘टीझर’द्वारे दिली माहिती

Reliance Jio च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज...

Reliance Jio च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज आहे. कंपनीने एक बंडल ऑफर आणली असून यामध्ये जिओ ग्राहकांना Disney+ Hotstar VIP चं सबस्क्रिप्शन एका वर्षापर्यंत मोफत मिळणार आहे. कंपनीने यापूर्वीही ग्राहकांना Hotstar Premium सबस्क्रिप्शन मोफत दिलं होतं. पण, Disney+ Hotstar VIP चं एका वर्षाचं मोफत सबस्क्रिप्शन कंपनीकडून पहिल्यांदाच दिले जाणार आहे.

कंपनीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत माहिती दिली आहे. एका टीझर पोस्टद्वारे आपल्या ग्राहकांना एका वर्षापर्यंत Disney+ Hotstar VIP चं सबस्क्रिप्शन मोफत देणार असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. मात्र हे मोफत सबस्क्रिप्शन एखाद्या खास प्लॅनसोबत दिलं जाणार आहे की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. याशिवाय ही ऑफर कधीपासून सुरू होईल याबाबतही माहिती देण्यात आलेली नाही. पण, वेबसाइटच्या टीझर बॅनरवर कंपनीने “coming soon” असा उल्लेख केला आहे. त्यामुळे लवकरच ही ऑफर लाँच होण्याची शक्यता आहे.

याशिवाय, जिओने एक खास ऑफर आणली असून याअंतर्गत ग्राहकांना मोफत हाय स्पीड डेटा दिला जात आहे. कंपनीकडून आपल्या ग्राहकांना 5 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा अगदी मोफत दिला जात आहे. पण, ही ऑफर कंपनीकडून काही निवडक ग्राहकांनाच दिली जातेय. अनेक युजर्सनी कंपनीकडून मोफत 2GB डेली अ‍ॅड ऑन डेटा पॅक मिळाल्याच्या पोस्ट्स सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. या युजर्सना 5 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा म्हणजे एकूण 10GB अतिरिक्त डेटा मोफत मिळाला आहे. पण, कोणत्या युजर्सना कंपनीकडून मोफत डेटा दिला जातोय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अनेकांना ‘रँडम’ पद्धतीने हा डेटा मिळालाय. तुम्हाला फ्री डेटा मिळाला आहे की नाही हे तुम्ही ‘माय जिओ’ अ‍ॅपच्या ‘माय प्लॅन्स’ सेक्शनमध्ये जाऊन चेक करु शकतात. इथे तुम्हाला डेटा पॅक टायटलमध्ये डीटेल्स दिसतील. जर तुम्हाला अतिरिक्त डेटा मिळाला असेल तर तुमच्या सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह प्लॅनसोबत अतिरिक्त डेटाही दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 8:44 am

Web Title: reliance jio soon to offer 1 year of free disney hotstar vip subscription for its customers sas 89
टॅग : Reliance Jio
Next Stories
1 ५ जून रोजीच का साजरा केला जातो पर्यावरण दिन? जाणून घ्या यंदाची थीम
2 जाणून घ्या वटपूजनाचे महत्व आणि मुहूर्त
3 … म्हणून साजरी केली जाते वटपौर्णिमा
Just Now!
X