News Flash

आता फोन मार्केटवरही Jio करणार कब्जा ? लवकरच 10 कोटी स्वस्त 4G स्मार्टफोन करणार लाँच

टेलिकॉम सेक्टरमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतर आता स्मार्टफोनच्या बाजारात दाखवणार ताकद

टेलिकॉम सेक्टरमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतर आता रिलायन्स जिओ स्मार्टफोनच्या बाजारात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. कारण, रिलायन्स जिओ डिसेंबर 2020 च्या अखेरपर्यंत भारतात 10 कोटी स्वस्त 4जी स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे.

बिजनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, रिलायन्स जिओ डिसेंबर अखेरपर्यंत 10 कोटी स्वस्त 4जी स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्वस्त 4जी स्मार्टफोन गुगल अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या सुरूवातीला फोन कंपनी लाँच करु शकते, असं या वृत्तामध्ये म्हटलं आहे. जिओचा हा 4G फोन गुगलसोबतच्या भागीदारीअंतर्गत लाँच होण्याची शक्यता आहे.

काही महिन्यांपूर्वीच गुगलने जिओमध्ये 4.5 बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर गुगल एक स्वस्त अँड्रॉइड व्हर्जनवर काम करत असून, याच व्हर्जनमध्ये कंपनी आपला फोन लाँच करेल असं जुलै महिन्यात जिओकडून सांगण्यात आलं होतं.

गुगल आणि जिओच्या या स्वस्त 4जी स्मार्टफोनमुळे शाओमी, ओप्पो, व्हिवो, सॅमसंग आणि नोकिया यांसारख्या कंपन्यांना चांगलीच टक्कर मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 12:33 pm

Web Title: reliance jio to roll out 10 crore low cost android phones by december says report sas 89
Next Stories
1 5000mAh बॅटरी; किंमत फक्त 6,799 रुपये ; लेटेस्ट ‘बजेट’ स्मार्टफोनचा ‘सेल’
2 किंमत फक्त 7,499 + 5000mAh बॅटरी, ‘स्वस्त’ स्मार्टफोनवर शानदार ऑफर्स
3 Jio नंतर आता Silver Lake ची रिलायन्स रिटेलमध्ये ७,५०० कोटींची गुंतवणूक
Just Now!
X