19 February 2020

News Flash

जिओ फायबरची बंपर ऑफर, मोफत LED TV सोबत आणखी बरंच काही

जिओ फायबर योजनेचे किमान शुल्क मासिक ६९९ रुपये असून कमाल १जीबीपीएस इंटरनेट वेगक्षमता देऊ करण्यात आली आहे.

Reliance JioFiber Welcome offer : ‘जिओ’च्या यशानंतर रिलायन्स बाजारामध्ये ‘जिओ फायबर’ ही ऑप्टिकल फायबर केबल आधारित ब्रॉडबँड सेवा घेऊन आली आहे. गुरूवारी जिओ फायबर सेवेचं कमर्शिअल लाँचिंग करण्यात आलं आहे. जिओ फायबर योजनेचे किमान शुल्क मासिक ६९९ रुपये असून कमाल १जीबीपीएस इंटरनेट वेगक्षमता देऊ करण्यात आली आहे. गोल्ड आणि त्यापेक्षा मोठ्या प्लानसोबत एक एचडी टीवी दिला जाणार आहे. गोल्ड प्लॅनची किंमत प्रतिमहिना १२९९ रूपये आहे. शिवाय ४के सेट टॅप बॅक्स, दूरचित्रवाणी संच, ओटीटी अॅहप आदींचीही जोड निवडक योजना पर्यायांवर आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो त्याच दिवशी त्वरित पाहण्याची संधीही ही योजना देते. रिलायन्स जिओ फायबर योजनेकरिता एकरकमी जोडणी शुल्क २,५०० रुपये असून त्यात १,५०० रुपयांच्या अनामत ठेव रकमेचा समावेश आहे.

(आणखी वाचा : अशी करा जिओ फायबरसाठी नोंदणी )

देशातील सर्वाधिक मोबाइल ग्राहकसंख्या असलेल्या रिलायन्स जिओ अंतर्गतच ‘जिओ फायबर’ या नावाने ही सेवा गणेशोत्सवादरम्यान गुरुवारी जाहीर करण्यात आली. तीन वर्षांपूर्वी ज्या दिवशी जिओ सेवा दाखल झाली त्याच दिवशी या नव्या सेवेचे देशभरात एकाच वेळी १,६०० शहरांमध्ये अनावरण करण्यात आले आहे. दरांच्या तुलनेत स्पर्धकांना आव्हान देणाऱ्या रिलायन्स जिओ फायबरने ग्राहकांना विविध शुल्क व कालावधीचे पर्याय, खास सेवा वैशिष्टय़ांसह उपलब्ध करून दिले आहेत. मासिक ६९९ ते ८,४९९ रुपये दरम्यान प्री-पेड व पोस्ट पेड अशा विविध पर्यायात व वेगवेगळ्या कालावधीसाठी ही सेवा उपलब्ध झाली आहे.

एचडी सेट टॉप बॉक्स, राऊटर, देशभरात कुठेही नि:शुल्क व्हॉइस कॉलिंगची सुविधा, टीव्हीवर बेतलेली व्हिडीओ कॉलिंग आणि कॉन्फरन्सिंग सुविधा, तसेच खेळ व सुरक्षाविषयक बाबीही याद्वारे ग्राहकांना उपभोगता येतील.

६९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये काय आहे?

हा जिओचा बेसिक ब्रॉन्झ प्लॅन असून यामध्ये युजर्सना १०० एमबीपीएसचा स्पीड मिळेल. तसेच अनलिमिटेड डेटा (१०० जीबी+ ५० जीबी एक्स्ट्रा) मिळेल. त्याचबरोबर यामध्ये फ्री व्हॉईस कॉलिंग मिळेल. यामध्ये युजर्सना भारतातील कोणत्याही क्रमांकावर फोन करता येईल.

८४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये काय आहे?

८४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १०० एमबीपीएस पर्यंत स्पीड मिळेल. तर अनलिमिटेड डेटा (२०० जीबी + २०० जीबी एक्स्ट्रा) मिळेल. यामध्येही युजर्सना मोफत व्हॉईस कॉलिंगचा फायदा मिळेल.

१२९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळेल मोफत टीव्ही

जिओच्या १२९९ रुपयांच्या गोल्ड प्लॅनमध्ये ग्राहकाला २५० एमबीपीएसचा स्पीड मिळेल. तसेच अनलिमिटेड (५०० जीबी + २५० जीबी एक्स्ट्रा) डेटा मिळेल. मोफत व्हॉईस कॉलिंगही मिळेल तसेच ग्राहकाला यात 4K स्मार्ट टीव्ही मोफत मिळेल.

२४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये काय आहे?

या डायमंड प्लॅनमध्ये ग्राहकाला ५०० एमबीपीएसचा स्पीड मिळेल. तसेच अनलिमिटेड डेटा (१२५० जीबी + २५० जीबी एक्स्ट्रा) मिळेल. यातही मोफत व्हॉईस कॉलिंग मिळेल. तसेच यामध्ये ग्राहकाला २४ इंची एचडी टीव्ही मिळेल.

First Published on September 6, 2019 11:42 am

Web Title: reliance jiofiber welcome offer these plans come with free led tv offer nck 90
Next Stories
1 आता मार्क झकरबर्ग शोधून देणार तुम्हाला आयुष्याचा जोडीदार
2 YouTube ला 1227 कोटी रुपयांचा जबर दंड
3 महाराष्ट्र पोलीस दलात मोठी भरती, २३ सप्टेंबरपर्यंत करू शकता अर्ज
Just Now!
X