28 November 2020

News Flash

Jio चा 129 रुपयांचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन, 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळणार ‘हे’ फायदे

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे आपल्या ग्राहकांसाठी 24 दिवसांपासून ते एक वर्षापर्यंत व्हॅलिडिटी असेलेले अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत.

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे आपल्या ग्राहकांसाठी 24 दिवसांपासून ते एक वर्षापर्यंत व्हॅलिडिटी असेलेले अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत. जिओकडील सर्वात स्वस्त मोबाइल प्रीपेड प्लॅन 129 रुपयांचा आहे. सविस्तर जाणून घेऊया जिओकडील 200 रुपयांपेक्षा कमी प्लॅन्सबाबत.

जिओ 129 रुपयांचा प्लॅन :-
जिओच्या 129 रुपयांच्या प्रीपेड पॅकची वैधता 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये एकूण 2 जीबी डेटा मिळतो. 2 जीबी डेटाची मर्यादा संपल्यानंतर डेटा स्पीड कमी होऊन 64 केबीपीएस इतका होतो. याशिवाय जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1 हजार मिनिटे मिळतात.

जिओचा 149 रुपयांचा प्लॅन :-
जिओच्या 149 रुपयांच्या रिचार्ज पॅकची व्हॅलिडिटी 24 दिवसांची आहे. ग्राहकांना या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा म्हणजे एकूण 24 जीबी डेटा मिळतो. दररोज मिळणारी डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 64 केबीपीएस होतो. यामध्ये ग्राहकांना 100 एसएमएस देखील मोफत मिळतात.

जिओचा 199 रुपयांचा प्लॅन :-
जिओच्या 199 रुपयांच्या रिचार्ज पॅकची व्हॅलिडिटी 28 दिवस आहे. या प्रीपेड पॅकमध्ये जिओ ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा म्हणजे एकूण 42 जीबी डेटा मिळतो. जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड आणि नॉन-जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1 हजार मिनिटे मिळतात. याशिवाय दररोज 100 एसएमएस आणि जिओ अॅप्स देखील या पॅकमध्ये फ्री मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 11:53 am

Web Title: reliance jios cheapest prepaid plan of rs 129 with 28 days validity check details sas 89
Next Stories
1 जाणून घ्या : हिवाळ्यात त्वचा कोरडी का पडते?
2 पदवीधारकांना SBI मध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज
3 धक्कादायक! करोनामुक्त झाल्यानंतर रुग्णांच्या मेंदूवर परिणाम
Just Now!
X