22 April 2019

News Flash

Reliance’s Jio Phone 3 : आता जिओचा फोन टचस्क्रीन

जिओफोन 3 ची किंमत ४, ५०० रूपये

जिओ फोन आणि जिओ फोन २ च्या यशानंतर रिलायंस आता रिओ फोन ३ घेऊन येत आहे. या फोनचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा फोन टचस्क्रीन असणार आहे. रिपोर्ट्सनुसार जिओ फोन ३ जून २०१९ मध्ये बाजारात येणार आहे. रिलायंसने २०१७ मध्ये पहिल्यांदा जिओ फोन लाँच केला होता. पहिल्या फोनला मिळालेल्या प्रतिसादानंतर जिओ फोन २ आणला. या दोन्ही फोनला टेलिकॉम क्षेत्रात चांगले यश मिळाले. जूनमध्ये जिओ फोन ३ ग्राहकांसाठी उपलबद्ध होणार आहे.

अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत जिओ फोनने मोबाइल क्षेत्राममध्ये आपलं नाव कमावले आहे. जिओ फोन सध्या भारतातील अव्वल १० ब्रँडमध्ये स्थान मिळवलं आहे. फिचर फोनच्या बाबतीत जिओ फोन सध्या भारतीय मार्केटमध्ये अव्वल स्थानावर आहे. BeetelBite च्या रिपोर्ट्सनुसार, रिलायंस जिओफोन 3 ची किंमत ४, ५०० रूपये असणार आहे. जिओ फोन आणि जिओ फोन २ पेक्षा हा फोन महागडा आहे.

काय असतील फिचर्स –
– पाच इंच डिस्प्ले
– 2 GB रॅम
– 64 GB इंटरनल स्टोरेज
– मायक्रो एसडी स्लॉट
– टचस्क्रीन
– पाच मेगाफिक्सल रिअर कॅमेरा
– दोन मेगाफिक्सल सेल्फी कॅमेरा

First Published on February 6, 2019 12:26 pm

Web Title: reliances jio phone 3 be a touchscreen smartphone to launch in june 2019