आजकाल अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येमुळे अनेक जण त्रस्त आहेत. कमी वयामध्ये केस पांढरे झाल्यामुळे अनेक जण विविध मार्गाने हे केस लपवण्याचा प्रयत्न करतात. मग यात काही जण केसांना मेहंदी लावतात तर काही जण केस हायलाइट्स करण्याला पसंती देतात. मात्र केसांवर सतत केमिकल्सचा मारा झाल्यामुळे त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतात. यात अनेकदा केसगळतीची समस्यादेखील सुरु होते. खरंतर केस अकाली पांढरे होण्याची अनेक कारणे आहेत. त्यामुळे केस पांढरे होऊ लागले किंवा झाले असतील तर त्यांची काळजी कशी घ्यावी आणि पुन्हा केसांना काळा रंग कसा मिळवावा याविषयी जाणून घेऊयात.

घ्या ‘ही’ काळजी

१. एक-दोन केस पांढरे झाले असल्यास ते केस तोडू नका. असे केल्याने इतर काळे केसही पांढरे होऊ लागतात.

२. थोडे केस पांढरे झाले असल्यास डाय करू नका. त्यामुळे काळ्या केसावरही परिणाम होतो आणि केस आणखी वेगाने पांढरे होऊ लागतात.

३.आठवड्यातून २ वेळा केस स्वच्छ धुणे.

४. संतुलित आहार घेणे.

५. केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.

६. केस धुण्यासाठी आवळा, रिठा, शिकेकाई, बेसन, दही इ. चा वापर करा.

७. खूप गोड पदार्थ, तेलकट, मसालेदार जेवण, दारु, अमली पदार्थ यांचे सेवन करु नका.

८. केसांमध्ये हेयर स्प्रे व केस वाळविण्यासाठी हेयर ड्रायरचा वापर कमीत कमी प्रमाणात करावा.

९. पुरेशी झोप

१०. व्यायाम करणे

११. आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करणे.

१२. पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य यांचं सेवन करणे.