Renault ने आपली दमदार एसयुव्ही Duster चं अपडेटेड व्हेरिअंट लाँच केलं आहे. कंपनीने 2019 Renault Duster मॉडलमध्ये काही नवे फीचर्स दिले आहेत. तसंच SUV च्या व्हेरिअंट लाइनअपमध्येही बदल करण्यात आला आहे. अपडेटेड रेनॉ डस्टर आता तीन व्हेरिअंट लेव्हल (RxE, RxS आणि RxZ) मध्ये उपलब्ध आहे. या बदलांनंतर रेनॉ डस्टरचं ऑटोमॅटिक ट्रांसमिशन व्हेरिअंट स्वस्त झालं आहे.

कंपनीने नव्या डस्टरमध्ये RxS डिझेल-AMT व्हेरिअंटचा समावेश केला आहे. 12.10 लाख रुपये (एक्स शोरूम ) इतकी या व्हेरिअंटची किंमत ठेवण्यात आली आहे. याच्याजागी 110PS पावर असणारं RxZ AMT व्हेरिअंट बंद करण्यात आलं आहे. या व्हेरिअंटची किंमत 12.33 लाख रुपये होती. याशिवाय डस्टरचे एंट्री लेव्हल व्हेरिअंट 85PS पावर असलेलं डिझेल स्टँडर्ड आणि मिड व्हेरिअंट पेट्रोल RxL देखील बंद करण्यात आलं आहे. कंपनीने पेट्रोल RxL च्या जागी पेट्रोल-मॅन्युअल RxS व्हेरिअंटचा समावेश केला आहे. आधी हे व्हेरिअंट केवळ सीव्हीटी गिअरबॉक्समध्ये उपलब्ध होतं.एसयुव्हीचं ऑल व्हिल ड्राइव्ह (AWD) व्हेरियंट अजूनही टॉप व्हेरिअंट 110PS पावर असलेल्या RxZ डिझेलमध्येच उपलब्ध आहे.

नवे फीचर –

नव्या डस्टरमध्ये अपग्रेडेड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आलंय, हे सिस्टिम आता अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्ट करतं. विशेष म्हणजे कंपनीने अपडेटेड डस्टरमध्ये चालकाच्या बाजूच्या एअरबॅगचा स्टँडर्ड किटमध्ये समावेश केलेला नाहीये, तर एबीएस फीचर स्टँडर्ड किटमध्ये आहे.

इंजिन –

मॅकेनिकली डस्टरमध्ये काही बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये 1.5-लिटरचं पेट्रोल इंजिन आहे, हे इंजिन 106PS ची पावर जनरेट करतं. एसयुव्हीमध्ये 1.5-लिटरचं डिझेल इंजिन आहे, हे इंजिन 85PS आणि 110PS पावरच्या दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल व्हेरिअंटमध्ये 5-स्पीड मॅन्युअल हा सीव्हीटी गिअरबॉक्सचा पर्याय आहे. 85PS पावर असलेल्या डिझेल इंजिनमध्ये केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. 110PS पावर असलेल्या डिझेल इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे.

किंमत –

– रेनॉ डस्टर(RXE) पेट्रोल इंजिन 7.99 लाख रुपये आणि डिझेल (85PS) 9.19 लाख रुपये

– रेनॉ डस्टर(RXS) पेट्रोल इंजिन 9.19 लाख रुपये आणि डिझेल (85PS) 9.99 लाख रुपये

– रेनॉ डस्टर(RXS CVT) पेट्रोल इंजिन 9.99 लाख रुपये

– रेनॉ डस्टर(RXS AMT) डिझेल (110PS) 12.09 लाख रुपये

– रेनॉ डस्टर (RXZ) डिझेल (85PS)11.19 लाख रुपये, डिझेल (110PS) 12.09 लाख रुपये

– रेनॉ डस्टर (RXZ AWD) डिझेल (110PS)13.09 लाख रुपये