Renault ने आपली लोकप्रिय एसयूव्ही Duster च्या किंमतीत 1.5 लाख रुपयांची कपात केली आहे. काही ठराविक व्हेरिअंट्सवर ही कपात करण्यात आली असून ही ऑफर केवळ 31 जानेवारीपर्यंतच लागू असेल. याशिवाय कंपनी या एसयूव्हीवर कॅश डिस्काउंट आणि लॉयल्टी बोनस यांसारख्या अन्य ऑफरही देत आहे.

कंपनीने डस्टरच्या केवळ डिझेल इंजिन असलेल्या ठराविक व्हेरिअंट्सची एक्स शोरूम किंमतीत कमी केलीये. 85 PS पावरच्या RxS डिझेल व्हेरिअंट्सची किंमत 70 हजार, 110PS पावरच्या RxS व्हेरिअंटची किंमत 1.2 लाख आणि 110PS पावरच्या ऑल व्हिल ड्राइव्ह व्हेरिअंटची किंमत 1.5 लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. याशिवाय कंपनी डस्टरच्या अन्य सर्व डिझेल व्हेरिअंट्सवर 50 हजार रुपये कॅश डिस्काउंटची ऑफर देत आहे. किंमतीत कपात आणि कॅश डिस्काउंटशिवाय कंपनी डस्टर एसयूव्हीवर 20 हजार रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस, 10 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट, तसेच स्टॉकमध्ये उपलब्ध डस्टरच्या प्री-फेसलिफ्टेड मॉडेलवरही ऑफर आहे.

लूक
फेसलिफ्ट डस्टरमध्ये क्रोम फिनिशसह नवीन फ्रंट ग्रिल, एलईडी डीआरएलसह प्रोजेक्टर हेडलॅम्प, नवीन फ्रंट बंपर, फ्रंट आणि रिअर स्किड प्लेट्स, रूफ रेल्स, 16-इंच एव्हरेस्ट डायमंड कट अॅलॉय व्हिल्स आणि मागे प्लास्टिक क्लॅडिंग आहे. बोनटमध्येही बदल करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या मॉडलपेक्षा यातील बोनट अधिक उंच आहे.

इंटेरियर –
यात अॅपल कार-प्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह अपग्रेडेड टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम आणि सेंटर कंसोलवर एसी व्हेंट्स आहेत. डॅशबोर्डलाही नवं डिझाइन देण्यात आलं असून सेंटर कंसोल आणि इंस्ट्रुमेंट क्लस्टरमध्येही थोडाफार बदल आहे.

सुरक्षा –
सुरक्षिततेसाठी यामध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, एबीएस, सीट बेल्ट रिमाइंडर, रिअर पार्किंग सेंसर्स आणि स्पीड अलर्ट सिस्टिम यांसारखे फीचर्स सर्व व्हेरिअंटमध्ये देण्यात आलेत. तर टॉप व्हेरिअंटमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम आणि हिल-स्टार्ट असिस्टंट यांसारखे फीचर्स आहेत.

इंजिन –
फेसलिफ्ट डस्टरमध्ये वापरण्यात आलेले दोन्ही इंजिन आधीपासून उपलब्ध असलेल्या मॉडेलमधूनच घेण्यात आलेत. यात 1.5-लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 106hp ची ऊर्जा आणि 142Nm टॉर्क निर्माण करतं. या इंजिनासह 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्टेप CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. डस्टरचं डिझेल इंजिन 1.5-लिटरचं असून याला दो वेगवेगळे पावर आउटपुट आहेत. यातील कमी पावर असलेलं व्हर्जन 85hp ची ऊर्जा आणि 200Nm टॉर्क निर्माण करतं. या व्हर्जनसह केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल. तर अधिक पावर असलेलं व्हर्जन 110hp ची ऊर्जा आणि 245Nm टॉर्क निर्माण करतं. या व्हर्जनसोबत 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल.