ऑटो कंपनी Renault ने आपली सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही Renault Kiger च्या किंमतीत वाढ केली आहे. फेब्रुवारी महिन्यात कंपनीने ही एसयूव्ही भारतीय मार्केटमध्ये लाँच केली होती. सध्याच्या भारतीय ऑटो मार्केटमधील सर्वात स्वस्त एसयूव्ही अशीही Renault Kigerची ओळख आहे.

कंपनीने Renault Kiger च्या किंमतीत 33 हजार रुपयांची वाढ केली आहे. किंमत वाढवण्यामागे कोणतंही कारण कंपनीकडून सांगण्यात आलेलं नाही. पण, वाहन निर्मितीसाठी वाढलेला खर्च आणि करोना महामारीचा व्यवसायावर झालेला परिणाम यामुळे कंपनीने किंमत वाढवल्याची शक्यता आहे.

Renault Kiger इंजिन :-
Renault Kiger SUV दोन पेट्रोल इंजिनच्या पर्यायात येते. यातील 1.0-लिटरचं टर्बोचार्ज्ड 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन 100 Ps ची पॉवर आणि 160 Nm टॉर्क निर्माण करतं. तर, दुसरं 1.0 लिटरचं नॅचरली अॅस्पिरेटेड मोटार पेट्रोल इंजिन 72 Ps ची पॉवर आणि 96Nm टॉर्क निर्माण करतं. दोन्ही इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि CVT ट्रान्समिशनचा पर्याय मिळेल. यासोबतच रायडिंगच्या चांगल्या अनुभवासाठी Eco, Normal आणि Sport असे तीन ड्रायव्हिंग मोड्सही आहेत.

बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत बदल नाही :-
फेब्रुवारी महिन्यामध्ये कंपनीने Renault Kiger SUV भारतात 5.45 लाख रुपये(एक्स-शोरुम) या बेसिक किंमतीत लाँच केली होती. किगरच्या बेसिक व्हेरिअंट आरएक्सई एनर्जी एमटी आणि आरएक्सई एनर्जी एमटी ड्युअल टोनची किंमत अजूनह अनुक्रमे 5.45 लाख रुपये आणि 5.65 रुपये आहे. मात्र, अन्य व्हेरिअंट्सच्या किंमतीत 3,000 रुपयांपासून 33 हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. सविस्तर जाणून घेऊया सर्व मॉडेल्सची किंमत :-

1.0L नॅचरली अॅस्पिरेटेड(NA) पेट्रोल इंजिन व्हेरिअंट नवीन एक्स-शोरुम किंमत :-
RXE (MT) 5.45 लाख रुपये
RXL (MT) 6.32 लाख रुपये
RXL (AMT) 6.82 लाख रुपये
RXT (MT) 6.8 लाख रुपये
RXT (AMT) 7.3 लाख रुपये
RXZ (MT) 7.69 लाख रुपये
RXZ (AMT) 8.19 लाख रुपये

1.0L टर्बो पेट्रोल इंजिन व्हेरिअंट नवीन एक्स-शोरुम किंमत :-
RXL (MT) 7.42 लाख रुपये
RXT (MT) 7.9 लाख रुपये
RXT (AMT) 8.6 लाख रुपये
RXZ (MT) 8.79 लाख रुपये
RXZ (AMT) 9.55 लाख रुपये