भारतातील विश्वसनीय युरोपियन ब्रँड रेनो या फ्रेंच मोटार कंपनीची Renault Triber  ही कॉम्पॅक्ट एमपीव्ही (मल्टी पर्पज व्हेइकल) कार काही दिवसांपूर्वीच भारतात लाँच झाली. केवळ पेट्रोल इंजिन प्रकारात ही कार भारतीय बाजारात उतरवण्यात आली असून ४.९५ लाख ते ६.४९ लाख रुपयांदरम्यान (एक्स-शोरुम) या कारच्या चार व्हेरिअंटची किंमत आहे.

ही सात सीटर कार चार मीटरपेक्षा कमी लांबीची आहे. रेनो ट्रायबर हे आकर्षक डिझाइन असलेले दणकट, संक्षिप्त, ऐसपैस जागा असलेले, मॉडय़ुलर वाहन आहे, ज्यामध्ये चार मीटरहून कमी जागेत सात व्यक्ती सहज बसू शकतात. यामुळे रेनोची ट्रायबर या श्रेणीत गेम चेंजर ठरणार आहे. ट्रायबर हे आधुनिक, प्रशस्त तरीही संक्षिप्त, अल्ट्रा-मॉडय़ुलर, इंधनाची बचत करणारे वाहन आहे, ज्यामध्ये आकर्षक इंटेरिअरसह अनेक आधुनिक आणि वैशिष्टय़े आहेत.

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
Is this waitress serving at a restaurant in China robot or human Find out
भारताला ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ का म्हटले जाते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण…
should i file income tax
विश्लेषण : लगेचच आयटीआर दाखल करण्यासाठी घाई का करू नये?
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कारची डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता आहे. रेनो ट्रायबर हा भारत आणि फ्रान्समधील रेनो टीमचा संयुक्त प्रकल्प आहे. तसेच हे जगातील पहिले असे वाहन आहे, जे विशेषत: भारतीय बाजारपेठांसाठी रेनोने डिझाइन केले आहे. कंपनीच्या क्विड या कारच्या पुढील सेगमेंटमध्ये ही कार येते. आधुनिक, प्रशस्त, मॉडय़ुलर आणि इंधनाची बचत करणारी अशा शब्दांत रेनोने ट्रायबरचे वर्णन केले आहे. भारतात रेनोच्या वाटचालीवर ट्रायबरच्या यशाचा परिणाम निश्चितच होणार आहे.

रेनो ट्रायबरचा लूक आकर्षक आहे. गाडीच्या बॉडीला साजेसे विंडस्क्रीन व रियर विंडो तसेच स्लाईट रूफ ड्रॉप गाडीच्या देखणेपणात भर पडते. फ्रंट-बम्पर दणकटपणा दर्शवतात. याचा ग्राऊंड क्लिअरन्स १८२ एमएमचा आहे. स्कल्पटेड बोनेट, फ्रंट आणि रियर एसयूव्ही स्किड प्लेट्स, रूफ बार्स व ब्लॅक प्लास्टिक व्हील आर्क प्रोटेक्शन आणि लोअर प्रोटेक्टीव्ह डोअर पॅनल्स वाहनाला साहसी लूक प्रदान करतात, त्याला सर्व प्रकारच्या रस्त्यांसाठी साजेसे बनवतात. रेनो ट्रायबरच्या पुढील बाजूस त्यांच्या पारंपरिक शैलीनुसार डिझाइन ठेवण्यात आली आहे. गाडीला एलईडी डेटाईम रनिंग लाईट गोलाकार क्रोम व काळय़ा हेडलॅम्प मास्कसमध्ये देण्यात आले आहेत. रेनोचा लोगो हा ट्रिपल एज क्रोम फ्रंट ग्रीलवर अधोरेखित करण्यात आला असून त्याचा विस्तार प्रोजेक्टर हेडलॅम्पपर्यंत आहे.

दोन भाग असलेले रिअर ईगल बिक टेल लॅम्प विंग्जचा बाहेरील भाग विस्तारित आहेत व टेलगेटच्या मध्यावरील केंद्रावर येतात, यामुळे वाहनाला विस्तारित स्वरूप मिळते. एसयूव्ही स्किड प्लेट्स बम्पपर्यंत देण्यात आल्या आहेत. रेनो ट्रायबरचे केबिन आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. रेनो ट्रायबरच्या अंतर्गत सजावटीत दुहेरी रंगसंगतीचा वापर करण्यात आला आहे. डॅशबोर्डवरील वरच्या भागाला गडद काळा तर खालील भागाला आणि डोअर ट्रीम्सला बेज आणि पांढरा रंग ठेवण्यात आला आहे. याच्या एअर व्हेंट्सवर, एअर कण्डिशण्ड डायल्स, स्टार्ट/स्टॉप बटणावर, डॅशबोर्डवरील सिल्व्हर असेंटवर क्रोम ट्रिम आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सीटच्या मध्यभागी मध्यवर्ती रेफ्रिजरेटेड स्टोरेज एरिया आणि कपहोल्डर्स देण्यात आले आहेत, त्याशिवाय लोअर ग्लोव्ह कम्पार्टमेंटदेखील आहे, हा देखील रेफ्रिजरेटेड असून अप्पर ग्लोव्ह कम्पार्टमेंटची क्षमता चार लिटरहून अधिक आहे. रेनो ट्रायबरमध्ये ३१ लिटपर्यंतची स्टोरेज कम्पार्टमेंटची सोय आहे. याच आकाराच्या इतर हॅचबॅकच्या तुलनेत साधारणपणे दुप्पट व्यवस्था आहे, असा कंपनीचा दावा आहे.

रेनो ट्रायबरच्या २०.३२ सेमी (८ इंच) मल्टिमीडिया टच स्क्रीनमध्ये मीडियानेव्ह इवोल्यूशन मल्टिमीडिया सिस्टीमशी जोडलेले आहे. यामधील स्मार्टफोन रिप्लिकेशन वैशिष्टय़ासमवेत ते अ‍ॅण्ड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्लेसोबत अनेक ड्रायव्हिंग व मनोरंजक अ‍ॅप्सना जोडता येते. यामधील मल्टिमीडिया सिस्टीमवर यूएसबी प्लगच्या साथीने व्हिडीयो सुरू करता येतात. डॅशबोर्डवर मल्टिमीडिया टच स्क्रीन देण्यात आले आहे. डिजिटल एलईडी इन्स्ट्रमेंट क्लस्टरसोबत ८.९ सेमी एलसीडी स्क्रीनवर तीन व्हच्र्युअल गॉज टचमीटर, फ्युएल लेव्हल आणि इंजिन टेम्परेचरसाठी देण्यात आले आहेत. हॅण्ड्स-फ्री कार्डमुळे दरवाजे उघड-बंद करता येतात आणि यातील स्मार्ट स्टॉप बटनद्वारे इंजिन सुरू करता येते. कार्डमधील सेन्सरमुळे दरवाजे बंद किंवा उघडता येतात. यामधील हॅण्ड्स-फ्री सिस्टीममध्ये ऑटो-लॉक फंक्शन आहे, ज्यामुळे वेळेची बचत होते आणि ते हाताळायला सोयीचे ठरते.

रेनो ट्रायबरमध्ये पुढच्या आणि मागच्या सीटवर बसणाऱ्यांसाठी दुहेरी वातानुकूलन यंत्रणा देण्यात आली आहे. रेनो ट्रायबरमध्ये १.० लिटर ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन असून त्यातून ७२ पीएस सोबत ९६ एनएम टॉर्क निर्मिती होते. यामध्ये फाइव्ह-स्पीड ट्रान्समिशन आहे. हे डय़ुएल व्हीव्हीटी सिस्टीमप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असून इंजिन सर्व रेव्ह्सवर पुरेसा प्रतिसाद देते. लो लेव्हलपासून टॉर्क उपलब्ध असून पुरेशा एक्सलरेशनची खातरजमा करते, असा कंपनीचा दावा आहे.

ऐसपैस –

* रेनो ट्रायबरमध्ये एक ते सात जण आरामात बसू शकतात. चार मीटरपेक्षा कमी जागेत ही गाडी ऐसपैस लगेज स्पेस देण्याचा दावा करते. रेनो ट्रायबर ऐसपैस जागा उपलब्ध करून देते. यामध्ये पुढच्या सीटवर सर्वोत्तम कपल डिस्टन्स (७१० एमएम)चे आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या रांगेतील लेग रूम (२०० एमएमपर्यंत) व तिसऱ्या रांगेतील लेग-रूम (९१ एमएम)चा आहे. सोबतच त्यात १२ व्ही चार्जिग सॉकेटस आहेत व सर्व प्रवाशांसाठी वातानुकूलन यंत्रणेची सुविधा आहे. यामध्ये उंच प्रवासीदेखील अगदी आरामात दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेमधील सीटवर बसू शकतात. याची रूफ हाईट (८३४ एमएम) आहे,

* रेनो ट्रायबरमध्ये स्लायडिंग, रिक्लायनेबल, फोल्डेबल आणि टम्बल सेकंड-रो सीट्ससोबत मोठे दरवाजे आहेत. यामधील पहिल्यांदाच वापरण्यात आलेल्या इजीफिक्स सीट्स हाताळण्यास सोप्या असून तिसऱ्या रांगेतील स्वतंत्र सीट काढता येते. रेनो ट्रायबरमध्ये एकूण १०० पेक्षा अधिक वेगवेगळी सीट-कॉन्फिगरेशन उपलब्ध आहेत. रेनो ट्रायबरमध्ये सर्वोत्तम स्टोरेज कम्पार्टमेन्ट उपलब्ध आहे (३१ लिटर्सपर्यंत) तर सर्वोत्तम बूट क्षमता (६२५ लिटर्स) पाच सीटसाठी उपलब्ध आहे. सहा जणांकरिता बूट क्षमता ३२० लिटर्स तर सात व्यक्तींसाठी ८४ लिटर्सची राहील.

वैशिष्टये –

* एकूण १०० पेक्षा अधिक विविध सीट-कॉन्फिगरेशन्स, इझीफिक्स सीट्स यंत्रणा.

* चार एमचे प्रशस्त केबिन, ६२५ एल बूट स्पेस आणि ३१ एल पर्यंतची अंतर्गत स्टोरेज स्पेस

* २०.३२ सेमी (८-इंच) मल्टीमीडिया टच स्क्रीन

* १.० लिटरचे पेट्रोल इंजिन, कमी वाहन देखभाल खर्च