01 June 2020

News Flash

आली Renault ची नवीन Triber, बुकिंगलाही झाली सुरूवात

Renault Triber AMT भारतात लाँच...

Renault ने भारतीय बाजारात एमपीव्ही(मल्टी पर्पज व्हेइकल) सेगमेंटमध्ये Triber AMT लाँच केली आहे. Renault Triber AMT या नवीन कारची बेसिक किंमत कंपनीने 6.18 लाख रुपये (एक्स शोरुम) ठेवली आहे. ‘ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रांसमिशन’ अर्थात एएमटी प्रकारातील ही कार RXL, RXT आणि RXZ अशा तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आलीये. मॅन्युअल व्हर्जनच्या तुलनेत एएमटी मॉडेलची किंमत 40 हजारांहून अधिक आहे.

किंमत :-
कंपनीने या कारसाठी बुकिंगलाही सुरुवात केली आहे. तसेच येत्या काही आठवड्यांमध्ये कारची डिलिव्हरीही सुरू होईल असे कंपनीकडून सांगण्यात आले. एएमटी गिअरबॉक्स असलेल्या ट्रायबरच्या RXL व्हेरिअंटची किंमत 6.18 लाख, RXT व्हेरिअंटची किंमत 6.68 लाख आणि RXZ व्हेरिअंटची किंमत 7.22 लाख रुपये आहे. तर, मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये येणारी ट्रायबर चार व्हेरिअंट- RXE, RXL, RXT आणि RXZ मध्ये उपलब्ध आहे. मॅन्युअल व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 4.99 लाख, 5.78 लाख, 6.28 लाख आणि 6.82 लाख रुपये आहे. या सर्व एक्स शोरुम किंमती आहेत. ग्राहकांना ‘माय रेनो अ‍ॅप’, कंपनीचे अधिकृत डीलर्स किंवा https://renault.co.in या संकेतस्थळावर जाऊन बुकिंग करता येईल.

स्पेसिफिकेशन्स :-
सात आसनी क्षमतेच्या नव्या ट्रायबरमध्ये 5-स्पीड एएमटीशिवाय अन्य कोणताही मॅकेनिकल बदल कंपनीने केलेला नाही. आधीप्रमाणेच ही कॉम्पॅक्ट एमपीव्ही 1.0-लीटर, 3-सिलिंडर इंजिनसह उपलब्ध आहे. हे इंजिन 72hp ऊर्जा आणि 96Nm टॉर्क निर्माण करते. Triber AMT चे फीचर्स मॅन्युअल व्हर्जनप्रमाणेच आहेत. 4-मीटरहून कमी जागेत या एमपीव्हीच्या टॉप व्हेरिअंटमध्ये 4-एअरबॅग्स, रिअर कॅमेरा, रिअर डिफॉगर, वायपर, LED DRL, 15-इंच व्हील्स, अँड्रॉइड ऑटो, अ‍ॅपल कारप्ले आणि फोनवर आधारित नेविगेशनसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, की-लेस एंट्री, पॉवर अ‍ॅड्जस्टेबल विंग मिरर्स यांसारखे फीचर्स आहेत. याशिवाय सात आसनी क्षमतेच्या या कारचे सीट्स 5-सीटर, 4-सीटर आणि 2-सीटर मोडमध्ये आवश्यकतेनुसार अ‍ॅड्जस्ट करता येतात.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2020 4:40 pm

Web Title: renault triber amt launched in india at rs 6 18 lakh bookings also started sas 89
Next Stories
1 आता Flipkart वरही उपलब्ध झाला शाओमीचा ‘हा’ लोकप्रिय फोन
2 Realme चा भारतातील पहिला Smart TV ‘या’ तारखेला होणार लाँच; किंमत किती?
3 Airtel ची भन्नाट ऑफर, 100 पेक्षा कमी दरात 12GB डेटा
Just Now!
X