23 October 2020

News Flash

कशी आहे Renault ची नवीन Triber?

आधुनिक, प्रशस्त, मॉडय़ुलर आणि इंधनाची बचत करणारी रेनो ट्रायबर कार आहे. भारतात रेनोच्या वाटचालीवर ट्रायबरच्या यशाचा परिणाम निश्चितच होणार आहे.

युरोपियन ब्रँड रेनो या फ्रेंच मोटार कंपनीने भारतीय ऑटो सेक्टरमध्ये कॉम्पॅक्ट एसयूवी आणि कॉम्पॅक्ट हैचबॅक सेगमेंटचं नवीन युग आणलं आहे. Renault कंपनीने Triber ही नवीन कार भारतीय बाजारपेठेत आणली आहे. रेनो ट्रायबर हा भारत आणि फ्रान्समधील रेनो टीमचा संयुक्त प्रकल्प आहे. तसेच हे जगातील पहिले असे वाहन आहे, जे विशेषत: भारतीय बाजारपेठांसाठी रेनोने डिझाइन केले आहे. Triber ही मल्टी पर्पज व्हेइकल (MPV) प्रकारातील कार आहे. आधुनिक, प्रशस्त, मॉडय़ुलर आणि इंधनाची बचत करणारी रेनो ट्रायबर कार आहे. भारतात रेनोच्या वाटचालीवर ट्रायबरच्या यशाचा परिणाम निश्चितच होणार आहे.

ही सात सीटर कार चार मीटरपेक्षा कमी लांबीची आहे. रेनो ट्रायबर हे आकर्षक डिझाइन असलेले दणकट, संक्षिप्त, ऐसपैस जागा असलेले, मॉडय़ुलर वाहन आहे, ज्यामध्ये चार मीटरहून कमी जागेत सात व्यक्ती सहज बसू शकतात. यामुळे रेनोची ट्रायबर या श्रेणीत गेम चेंजर ठरणार आहे. ट्रायबर हे आधुनिक, प्रशस्त तरीही संक्षिप्त, अल्ट्रा-मॉडय़ुलर, इंधनाची बचत करणारे वाहन आहे, ज्यामध्ये आकर्षक इंटेरिअरसह अनेक आधुनिक आणि वैशिष्टय़े आहेत.

रेनो ट्रायबरच्या २०.३२ सेमी (८ इंच) मल्टिमीडिया टच स्क्रीनमध्ये मीडियानेव्ह इवोल्यूशन मल्टिमीडिया सिस्टीमशी जोडलेले आहे. यामधील स्मार्टफोन रिप्लिकेशन वैशिष्टय़ासमवेत ते अ‍ॅण्ड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्लेसोबत अनेक ड्रायव्हिंग व मनोरंजक अ‍ॅप्सना जोडता येते. यामधील मल्टिमीडिया सिस्टीमवर यूएसबी प्लगच्या साथीने व्हिडीयो सुरू करता येतात. डॅशबोर्डवर मल्टिमीडिया टच स्क्रीन देण्यात आले आहे. डिजिटल एलईडी इन्स्ट्रमेंट क्लस्टरसोबत ८.९ सेमी एलसीडी स्क्रीनवर तीन व्हच्र्युअल गॉज टचमीटर, फ्युएल लेव्हल आणि इंजिन टेम्परेचरसाठी देण्यात आले आहेत. हॅण्ड्स-फ्री कार्डमुळे दरवाजे उघड-बंद करता येतात आणि यातील स्मार्ट स्टॉप बटनद्वारे इंजिन सुरू करता येते. कार्डमधील सेन्सरमुळे दरवाजे बंद किंवा उघडता येतात. यामधील हॅण्ड्स-फ्री सिस्टीममध्ये ऑटो-लॉक फंक्शन आहे, ज्यामुळे वेळेची बचत होते आणि ते हाताळायला सोयीचे ठरते.

रेनो ट्रायबरमध्ये पुढच्या आणि मागच्या सीटवर बसणाऱ्यांसाठी दुहेरी वातानुकूलन यंत्रणा देण्यात आली आहे. रेनो ट्रायबरमध्ये १.० लिटर ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन असून त्यातून ७२ पीएस सोबत ९६ एनएम टॉर्क निर्मिती होते. यामध्ये फाइव्ह-स्पीड ट्रान्समिशन आहे. हे डय़ुएल व्हीव्हीटी सिस्टीमप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असून इंजिन सर्व रेव्ह्सवर पुरेसा प्रतिसाद देते. लो लेव्हलपासून टॉर्क उपलब्ध असून पुरेशा एक्सलरेशनची खातरजमा करते, असा कंपनीचा दावा आहे.

आणखी वाचा : MG Hector खरेदी करण्याची अजून एक संधी, पुन्हा होतेय बुकिंगला सुरूवात

ऐसपैस –

* रेनो ट्रायबरमध्ये एक ते सात जण आरामात बसू शकतात. चार मीटरपेक्षा कमी जागेत ही गाडी ऐसपैस लगेज स्पेस देण्याचा दावा करते. रेनो ट्रायबर ऐसपैस जागा उपलब्ध करून देते. यामध्ये पुढच्या सीटवर सर्वोत्तम कपल डिस्टन्स (७१० एमएम)चे आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या रांगेतील लेग रूम (२०० एमएमपर्यंत) व तिसऱ्या रांगेतील लेग-रूम (९१ एमएम)चा आहे. सोबतच त्यात १२ व्ही चार्जिग सॉकेटस आहेत व सर्व प्रवाशांसाठी वातानुकूलन यंत्रणेची सुविधा आहे. यामध्ये उंच प्रवासीदेखील अगदी आरामात दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेमधील सीटवर बसू शकतात. याची रूफ हाईट (८३४ एमएम) आहे,

* रेनो ट्रायबरमध्ये स्लायडिंग, रिक्लायनेबल, फोल्डेबल आणि टम्बल सेकंड-रो सीट्ससोबत मोठे दरवाजे आहेत. यामधील पहिल्यांदाच वापरण्यात आलेल्या इजीफिक्स सीट्स हाताळण्यास सोप्या असून तिसऱ्या रांगेतील स्वतंत्र सीट काढता येते. रेनो ट्रायबरमध्ये एकूण १०० पेक्षा अधिक वेगवेगळी सीट-कॉन्फिगरेशन उपलब्ध आहेत. रेनो ट्रायबरमध्ये सर्वोत्तम स्टोरेज कम्पार्टमेन्ट उपलब्ध आहे (३१ लिटर्सपर्यंत) तर सर्वोत्तम बूट क्षमता (६२५ लिटर्स) पाच सीटसाठी उपलब्ध आहे. सहा जणांकरिता बूट क्षमता ३२० लिटर्स तर सात व्यक्तींसाठी ८४ लिटर्सची राहील.

वैशिष्टये –

* एकूण १०० पेक्षा अधिक विविध सीट-कॉन्फिगरेशन्स, इझीफिक्स सीट्स यंत्रणा.

* चार एमचे प्रशस्त केबिन, ६२५ एल बूट स्पेस आणि ३१ एल पर्यंतची अंतर्गत स्टोरेज स्पेस

* २०.३२ सेमी (८-इंच) मल्टीमीडिया टच स्क्रीन

* १.० लिटरचे पेट्रोल इंजिन, कमी वाहन देखभाल खर्च

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 4:38 pm

Web Title: renault triber first drive review nck 90
Next Stories
1 Nokia 7.2 भारतात लाँच , 48MP क्षमतेचा कंपनीचा पहिलाच फोन; किंमत…
2 कार खरेदीकडे ‘नवतरुणांचा’ कल का कमी? ‘मारुती’च्या अध्यक्षांनी सांगितलं कारण
3 ई-सिगारेट म्हणजे नेमके काय? हे आहेत धोके
Just Now!
X