भारतात इलेक्ट्रिक गाड्यांचा ट्रेंड वाढतोय. गेल्या दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांच्या सेगमेंटमध्ये मोठी वाढ झाली असून इलेक्ट्रिक गाड्या खरेदीसाठी कल वाढतोय. यामुळे ऑटोमोबाइल क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या या सेगमेंटमध्ये आपले मॉडेल्स लाँच करत आहेत. आता Renault कंपनीही एक ‘मेड इन इंडिया’ इलेक्ट्रिक कार घेऊन येतेय.

आणखी वाचा – (किंमत फक्त…, शानदार ‘स्पोर्टी लुक’मध्ये लाँच झाली Maruti Ignis)

आणखी वाचा – (Maruti चा धमाका, फक्त 11 हजारांत बुक करा नवीन Brezza)

Renault ची भारतात तयार झालेली ही इलेक्ट्रिक कार CMF-A प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. ही इलेक्ट्रिक कार क्विडच्या आकाराची असेल. ही कार म्हणजे कंपनीच्या सेकंड जनरेशन क्विडचे इलेक्ट्रिक व्हर्जन असेल. भारतात 2015 मध्ये कंपनीने क्विड लाँच केली होती. तर, 2019 मध्ये कंपनीने क्विडसाठी अपडेटेड मॉडेल लाँच केले होते.

आणखी वाचा – (स्टॉक संपवण्यासाठी TATA च्या गाड्यांवर ‘बंपर’ डिस्काउंट)

आणखी वाचा – (मारुतीची ‘रावडी’ SUV! पहिली झलक दिसताच चर्चांना उधाण)

कंपनीची क्विड कार यापूर्वीच इलेक्ट्रिक प्रकारात चिनच्या मार्केटमध्ये K-ZE या नावाने लाँच करण्यात आली आहे. याशिवाय नुकत्याच झालेल्या ग्रेटर नोएडातील ऑटो एक्स्पोमध्ये ही कार सादर करण्यात आली होती. या कारमध्ये 33 kW ची मोटार असेल. ही मोटार 120 Nm टॉर्क निर्माण करते. साध्या 220V च्या प्लग पॉइंटद्वरेही चार्जिंग करता येईल असे कंपनीने म्हटले आहे. फास्ट चार्जिंग मोडमध्ये K-ZE ही कार 50 मिनिटांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक चार्ज होते. तर, स्लो चार्जिंग मोडमध्ये ही कार पूर्ण चार्ज होण्यासाठी चार तासांचा वेळ लागतो. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 240 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करु शकते, असा कंपनीचा दावा आहे. दिसायला ही कार क्विडप्रमाणेच दिसते, पण थोडेफार बदल केले जाऊ शकतात. ग्रिलमध्ये बदल, मोठ्या आकाराचा लोगो यांसारखे हे बदल असतील. याशिवाय आधीपेक्षा शार्प एलईडी हेडलँप, नव्या स्टाइलचे फ्रंट आणि रिअर बंपर आणि नव्या डिझाइनची टेललाइट असेल. कंपनी ही कार 2022 पर्यंत आणण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा -(Mahindra चा जलवा! सिंगल चार्जमध्ये तब्बल 520 Km धावणार , 5 सेकंदात 100 चा स्पीड)

आणखी वाचा -(देशातील 10 सर्वाधिक Popular Cars , ‘ही’ ठरली बेस्ट ; बघा संपूर्ण यादी)

आणखी वाचा – (Kia ची जबरदस्त ‘क्रेझ’, Seltos ठरली एक नंबर SUV)

आणखी वाचा – (स्वस्तात घ्या घर-दुकान! SBI कडून कर्जबुडव्यांच्या प्रॉपर्टीचा लिलाव, तुम्हीही करु शकता खरेदी)