लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ला टक्कर देण्यासाठी स्वदेशी इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप ‘संदेस’ (Sandes) आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, काही सरकारी अधिकाऱ्यांनी या अ‍ॅपचा वापर करण्यास सुरूवातही केली आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने WhatsApp च्या धर्तीवर अ‍ॅप बनवण्याची घोषणा केली होती. आता हे अ‍ॅप पूर्ण डेव्हलप झाल्याचं समजतंय.

बिजनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, सध्या Sandes अ‍ॅप काही सरकारी अधिकाऱ्यांना वापरण्यास देण्यात आलं असून अजून अ‍ॅपवर टेस्टिंग सुरू आहे. ‘गव्हर्नमेंट इंस्टंट मेसेजिंग सिस्टिम’ अर्थात GIMS च्या वेबसाइटवर (GIMS.gov.in) Sandes अ‍ॅपचा लोगो आहे, यात अशोक चक्र दिसतंय. सध्या सामान्य युजर्ससाठी अ‍ॅप वापरण्याची परवानगी नाहीये. या वेबसाइटवर क्लिक केल्यास सध्या ही सेवा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी( ‘This authentication method is applicable for authorised government officials’) आहे, असा मेसेज दिसतो.

आणखी वाचा- व्हिडिओ सेंड करण्याआधी Mute आणि Edit करता येणार, WhatsApp चं नवीन फिचर

अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मचा सपोर्ट Sandes अ‍ॅपला असून एखाद्या मॉडर्न चॅटिंग अ‍ॅपप्रमाणेच हे अ‍ॅप डेव्हलप करण्यात आलं आहे. Gims.gov.in च्या वेबसाइटवर Sandes बाबत काही माहितीही उपलब्ध आहे. यात साइन-इन LDAP, साइन-इन संदेस ओटीपी आणि संदेस वेब असे तीन पर्याय आहेत.

‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवरुन वादंग झाल्यानंतर अनेक युजर्स टेलिग्राम आणि सिग्नल अ‍ॅप्सकडे वळत आहेत. अशात आता लवकरच सरकारने डेव्हलप केलेल्या ‘मेड इन इंडिया’ Sandes अ‍ॅपचाही पर्याय लवकरच मिळण्याची शक्यता आहे.