17 January 2019

News Flash

डेटिंगवर जाताय? मुलगी पटवण्यासाठी हे लक्षात घ्या

एका सर्वेक्षणातून समोर आलं

प्रातिनिधिक छायाचित्र

सध्या स्मार्टफोनचा जमाना आहे, त्यामुळे स्मार्टफोनच्या जमान्यात जर का तुम्ही जुना फोन वापरत असाल तर मुलींवर त्यांची नकारात्मक छाप पडते असं नुकतंच एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. एखादा मुलगा जुना फोन वापरत असेल तर मुलींच्या मनात त्यांच्याविषयी नकारात्मक प्रतिमा तयार होते आणि अशा मुलांसोबत डेटवर जाण्यास मुली टाळाटाळ करतात असं ‘Match has found’ च्या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

अमेरिकेतल्या या डेटिंग साईटनं जवळपास पाच हजारांहून अधिक एकट्या राहणाऱ्या तरूणी आणि महिलांची मतं जाणून घेतली. यावेळी ९२ टक्के महिलांनी मुलं जर जुना फोन डेटिंगच्या वेळी सोबत ठेवत असतील तर नकारात्मक छाप पडत असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या स्मार्टफोनवरून आपण त्यांची पाऱख करत असल्याचंही या महिलांनी कबूल केलं आहे. इतकंच नाही तर अँड्राईड फोन युजर्स आणि आयफोन युजर्स यांच्यामध्ये एकमेकांची मोबाईलवरून पारख करण्याची चढाओढ जास्त पाहायला मिळते असंही म्हटलं आहे. अॅपल युजर्स डेट करत असलेल्या व्यक्तीकडे जर अँड्राईड फोन असेल तर अँड्राईड फोन वापरणाऱ्याबद्दल नकारात्मक भावना मनात निर्माण होण्याची शक्यता ही २१ पटींनी अधिक असते असंही सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

डेटला जाताना अनेकजण आपला फोन टेबलवर ठेवतात किंवा फोनवर बोलतात पण ६४ टक्के महिलांना असं वागणं बेशिस्तपणाचं वाटतं. त्यामुळे या ‘व्हॅलेंटाईन्स टे’ला कोणासोबत डेटवर जाण्याचा तुमचा प्लान असेल तर या गोष्टी मात्र आवर्जून लक्षात ठेवा.

First Published on February 13, 2018 11:19 am

Web Title: research shows that nearly 92 per cent women judge men on their date for carrying an older phone