25 February 2021

News Flash

अवेळी जेवण… हृदयविकारास निमंत्रण!

आपल्या शरीराची रचना नियमितपणा तसेच वेळेचे पालन करणारी अशी असते.

रात्री उशिरा जेवल्याने अनेक व्याधिंना निमंत्रण देण्याबरोबरच आरोग्याशी निगडीत अन्य समस्यादेखील उदभवत असल्याचे या संशोधनातून समोर आले.

जर तुम्हाला रात्री उशिराने जेवायची सवय असेल, तर ती तुमच्या शरीरास अपायकारक आहे. या सवयीचा तुमच्या शरीरातील अंतर्गत क्रियेवर खोलवर विपरित परिणाम होऊ शकतो. रात्री ७ ते ९ ही वेळ रात्रीच्या जेवणासाठी उत्तम असल्याचे ब्रिटनमधील एका पाहाणीत समोर आले आहे. ब्रिटनमधील संशोधकांनी उच्च रक्तदाबाने प्रभावित ७०० वयस्करांवर या बाबतचे प्रयोग केले. याअंतर्गत संशोधकांनी सर्व ७०० जणांना वेगवेगळ्या वेळी जेवण आणि न्याहारी दिली. अवेळी खाण्याचा शरीरावर होणाऱ्या परिणामांचे आकलन करणे हा या संशोधनाचा उद्देश होता. रात्री उशिरा जेवल्याने अनेक व्याधिंना निमंत्रण देण्याबरोबरच आरोग्याशी निगडीत अन्य समस्यादेखील उदभवत असल्याचे या संशोधनातून समोर आले.

वेळेवर न जेवल्याने मिळेल ते खाण्याकडे आपला कल असल्याचे या पाहणीतून समोर आले. मिळेत ते खाल्याने शरीरातील कॅलेरिज वाढण्याबरोबरच आपण शरीराला पोषक नसलेल्या आहाराचीदेखील निवड करतो. अशाप्रकारचा आहार आपल्या शरीरावर विपरीत परिणाम करतो. अवेळी खाणे म्हणजे झटपट काहीतरी तोंडात टाकणे अथवा चालता चालता खाता येऊ शकेल अशा पॅक्ड फूडचे सेवन करणे. हे खाद्यपदार्थ शरीराला ना उर्जा देत ना कुठला फायदा पोहोचवतात; किंबहुना अशा खाद्यपदार्थांमुळे शरीराला नुकसानच होते.

अयोग्यवेळी आहाराचे सेवन अथवा चुकीचा आहार घेतल्याने शरीरात कॉलेस्ट्रॉलची मात्रा वाढते. नियमित आणि योग्यवेळी आहार घेणारे उत्तम जीवन जगत असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. जेवणाच्या वेळेचे बंधन न पाळणाऱ्या अथवा उशिराने डिनर करणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो. आपल्या शरीराची रचना नियमितपणा तसेच वेळेचे पालन करणारी अशी असते. रात्री उशिरा जेवल्याने मेटॉबॉलिझम सुस्त होतात, परिणामी जाडेपणा आणि हृदयविकाराच्या धोक्यात वाढ होते. रक्तदाबावरदेखील अतिशय विपरीत परिणाम होतो. झोपायला जाण्याआधी दोन तासांपर्यंत काहीही खाऊ नये. यामुळे शरीरात हाय अलर्ट परिस्थिती निर्माण होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 5:13 pm

Web Title: researchers finds that if you dont have your dinner timely you may invite cardiac attack
Next Stories
1 खुल्या वातावरणात भोजन घेणे लाभदायक
2 तिबेटमधील कर्करोगरोधी औषधीला कृत्रिम पर्याय उपलब्ध
3 फॅशनबाजार : ‘बॅग’वतीचा सोस!
Just Now!
X