तुम्ही एका हाताने टॅबलेट मोबाईल वापरू शकता? मुख्यत्वे सध्या बाजारात उपलब्ध असणारे मोबाईल टॅब हे डिसप्ले मोठा असल्याने एका हातात वापरण्या जोगे नसतात. परंतु, यावर लेवोनेने बदल घडवत आपला नवा लेनोवो योगा टॅब बाजारात दाखल केला.
हा टॅब एका हातात सोयीस्कररित्या वापरता येऊ शकतो आणि टॅब वापरल्याच्या भावनेवरही कोणती बंधने निर्माण होत नाहीत. म्हणजेच, मोठा डिसप्ले हे टॅबचे वैशिष्ट्यही लेनोवो योगा टॅबमध्ये जपण्यात आलेले आहे.

टॅबकडे वळणारी संस्कृती लक्षात घेता लेनोवोने संगणक उत्पादनाच्या क्षेत्रातून उत्तम आणि संगणकाच्या तोडीस-तोड असे टॅब तयार करण्याचे ठरविले. त्यातून लेनोवोने दोन टॅब बाजारात दाखल केले. योगा टॅब दोन प्रकरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील ८ इंचाच्या टॅबची किंमत २२,९९९ रु. आणि १० इंचाच्या टॅबची किंमत २८,९९९ रु. इतकी आहे.
या दोन्ही मॉडेल्समध्ये उत्कृष्ट कार्यक्षमता, उत्तम बॅटरी आणि मुख्यम्हणजे एका हातात वापरता येण्याजोगा आकार या टॅबला देण्यात आला आहे.  एका सरासरी संगणकामध्ये जे फिचर्स उपलब्ध करून देण्यात आले असतात. ते सर्व फिचर्स या टॅबमध्ये देण्यात आलेले आहेत.