पुणे आणि दिल्लीमध्ये Revolt कंपनीच्या ई-मोटरसायकल्सना चांगला प्रतिसाद मिळालाय. या दोन मोठ्या शहरांमध्ये मिळालेल्या शानदार यशानंतर आता कंपनी अन्य शहरांमध्ये ‘एंट्री’ घ्यायच्या तयारीत आहे. दिल्ली, पुण्यानंतर Revolt ई-मोटरसायकल्स आता चेन्नई, हैदराबाद आणि अहमदाबादमध्येही उपलब्ध असेल. पण, त्यापूर्वी कंपनीने या बाइकच्या किंमतीत वाढ केली आहे.

(आणखी वाचा – Pulsar ला टक्कर, Hero ने आणली ‘झकास’ बाइक )

(आणखी वाचा – टू-व्हीलरमध्ये ‘ही’ ठरली नवीन BOSS, ‘स्प्लेंडर’वर केली मात)

अन्य शहरांमध्ये लाँच करण्याआधी कंपनीने RV400 इलेक्ट्रिक बाइकच्या किंमतीत वाढ केली आहे. आता या बाइकची नवीन किंमत एक लाख तीन हजार 999 रुपये झाली आहे. यापूर्वी ही किंमत 98 हजार 999 रुपये होती. किंमतीतील ही वाढ ‘वन टाइम पेमेंट ऑप्शन’साठी आहे. याशिवाय, बाइकच्या बुकिंगसाठी 3 हजार 999 रुपये द्यावे लागतील. तसेच, तुम्हाला रजिस्ट्रेशन/RTO, इंश्युरंस, स्मार्ट कार्ड, 3 वर्ष 4G कनेक्टिव्हिटीसाठी अनिवार्य शुल्कही द्यावे लागेल.

(आणखी वाचा – आली Honda ची ‘पॉप्युलर’ बाइक, आता एकाच व्हर्जनमध्ये होणार विक्री?)

4G LTE Sim –
RV400 ही बाइक रेबेल रेड आणि कॉस्मिक ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. ही स्मार्ट बाइक असून यामध्ये अनेक कनेक्टिव्हिटी फीचर्स दिले आहेत. यात बाइक लोकेशन, जिओ फेंसिंग, टेलेमॅटिक्स आणि साउंड सिलेक्शन यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. या इलेक्ट्रिक बाइकमध्ये 4 प्री-लोडेड मोटरसायकल साउंड्स दिले आहेत, यातील आवडीचा साउंड सिलेक्ट करता येईल. मोबाइलच्या रिंगटोनप्रमाणे साउंड चेंज करता येतात. ओव्हर दि एअर अपडेटच्या माध्यमातून साउंडसाठी अजून अपडेट दिले जातील असे कंपनीने सांगितले. रिव्होल्ट आरव्ही400 बाइक 4G LTE सिम असलेली बाइक असून याद्वारे बाइकचे सर्व इंटरनेट आधारित फीचर्स काम करतात.

(आणखी वाचा – पुण्यातून झालीये विक्रीला सुरूवात, पण बजाजची Chetak धावेचना…)

(आणखी वाचा – Pulsar ला टक्कर, Hero ने आणली ‘झकास’ बाइक )