03 June 2020

News Flash

बॉडी स्प्रेचा असा वापर ठरेल उपयुक्त

दिर्घकाळ सुवास राहण्यासाठी

प्रातिनिधिक छायाचित्र

शरीराला येणारा घाम आणि त्यामुळे येणारा दुर्गंध यामुळे आपल्या स्वतःला तर अस्वच्छ वाटतेच पण येणाऱ्या दुर्गंधाचा आपल्या आजूबाजूला असणाऱ्यांना त्रास होतो. यावर उपाय म्हणून मग बॉडी स्प्रे वापरण्याचा पर्याय आपण निवडतो. विविध प्रकारच्या सुगंधांचे बॉडी स्प्रे आपण वापरतो. कधी कोणाला भेट देण्यासाठीही आपण बॉडी स्प्रेची खरेदी करतो. सध्या बाजारात अनेक बनावट बॉडी स्प्रे सर्रास विक्री होत असल्याचे दिसते. काहीवेळा अशाप्रकारे रस्त्यावरुन घेतलेल्या बॉडी स्प्रेचा त्वचेला त्रास होऊ शकतो. बॉडी स्प्रे थेट त्वचेशी संबंधित असल्याने तो वापरताना काळजी घेणे महत्त्वाचे असते. शरीराच्या काही ठराविक भागांवर जीवाणू हल्ला करतात. कारण याठिकाणी घामाची रंध्रे जास्त अॅक्टीव्ह असतात. आपण नियमित वापरत असलेला बॉडी स्प्रे कशापद्धतीने वापरल्यास जास्त उपयुक्त होऊ शकतो हे आपल्याला माहित नसते. शरीराच्या अशा काही विशिष्ट जागा आहेत ज्याठिकाणी बॉडी स्प्रे मारल्यास तो दिर्घकाळ टिकतो. या जागा समजून घेणे गरजेचे आहे. याशिवाय आपल्या शरीराला सुवास येत असेल तर आपला आत्मविश्वासही नकळत वाढतो. पाहूयात काही महत्त्वाच्या टिप्स…

गळा – गळा हा शरीराच्या इतर अवयवांपेक्षा काही प्रमाणात उष्ण असतो. त्यामुळे याठिकाणी बॉडी स्प्रे मारल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. याठिकाणी बॉडी स्प्रे दिर्घकाळ टिकतो आणि परिसरात त्याचा सुवास पसरू शकतो.

केस – केस हे शरीराच्या सर्वात वरच्या भागात असल्याने वरच्या भागावर बॉडी स्प्रे मारल्यास तुमचे पूर्ण शरीर ताजेतवाने राहण्यास मदत होते. मात्र थेट केसांवर बॉडी स्प्रे मारणे केसांच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. त्यामुळे कंगव्यावर बॉडी स्प्रे मारुन मग या कंगव्याने केस विंचरावेत. केसात बॉडी स्प्रे जास्त काळ टिकत असल्याने हा उत्तम पर्याय आहे.

कोपराचा आतला भाग – कोपराच्या आतल्या भागावर बॉडी स्प्रे मारल्यास तो शिरांप्रमाणे पसरतो आणि दिर्घकाळ टिकतो. हा असा भाग आहे ज्याठिकाणी जीवाणू असू शकतात किंवा घामही जास्त येतो. त्यामुळे या भागावर बॉडी स्प्रे मारणे अत्यावश्यक असते.

मनगटावर – मनगटावर बॉडी स्प्रे मारुन दोन्ही हात एकमेकांवर घासावेत. ही बॉडी स्प्रेसाठी अतिशय उपयुक्त जागा असते. मनगटामध्ये रक्तवाहिन्या असल्याने त्याठिकाणी बॉडी स्प्रे अतिशय चांगल्या पद्धतीने पसरतो आणि दिर्घकाळ टिकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2017 11:00 am

Web Title: right spots to apply perfume on body
Next Stories
1 मनःशांती हवीये? हे आसन करुन पाहा
2 कॉफीमुळे मधुमेहापासून बचाव होण्यास मदत
3 जाणून घ्या ‘आयफोन ८’ च्या डिस्प्लेची किंमत
Just Now!
X