बुलेटची निर्मिती करणारी ख्यातनाम कंपनी ‘रॉयल एनफील्ड’ने भारतातील आपल्या सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक असलेल्या Bullet 350 च्या किंमतीत वाढ केली आहे. बुलेट 350 च्या किक स्टार्ट आणि इलेक्ट्रिक स्टार्ट या दोन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ झाली आहे.
Bullet 350 मध्ये सिंगल-चॅनल ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम) आहे. Bullet 350 ड्युअल-चॅनल ABS फीचरसह देखील उपलब्ध आहे. भारतातील कंपनीच्या लाइन-अपमधील बुलेट सर्वाधिक जुनं मॉडेल असून भारतीय बाजारात ही बाइक खूप लोकप्रिय आहे. Bullet 350 मध्ये 5 स्पीड ट्रांसमिशनसह 346cc सिंगल-सिलिंडर, एअर-कुल्ड इंजिन आहे. हे इंजिन 19.8 hp ची ऊर्जा आणि 28Nm पीक टॉर्क निर्माण करतं. सध्या कंपनी भारतात क्लासिक आणि थंडरबर्ड मॉडेल्सची टेस्टिंग घेत आहे. लवकरच हे नवे मॉडेल्स लाँच करण्याची शक्यता आहे. हे नवे मॉडेल्स आधीपेक्षा आकर्षक डिझाइन आणि फीचर्ससह लाँच होणार असल्याचं समजतंय.
नवी किंमत
ऑगस्टमध्ये लाँच करतेवेळी Bullet 350 KS (किक स्टार्ट) आणि Bullet 350 ES ची एक्स-शोरुम किंमत अनुक्रमे 1.12 लाख आणि 1.26 लाख रुपये होती. पण, किंमतीत वाढ झाल्याने आता नवी किंमत अनुक्रमे 1.14 लाख रुपये आणि 1.30 लाख रुपये झाली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 14, 2019 9:15 am