News Flash

आपल्या एनफिल्ड बुलेटची जगाच्या बाजारात रॉयल एंट्री

क्लासिक ५०० बुलेट दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश पॅराट्रूपर्सकडून वापरण्यात आलेल्या RE/WE 125 बाइकवरुन प्रेरित आहे

रॉयल एनफिल्डने क्लासिक ५०० बुलेटचं नवं एडिशन लॉन्च केलं आहे. याचं नाव पेगासस असं ठेवण्यात आलं आहे. ही बुलेट दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश पॅराट्रूपर्सकडून वापरण्यात आलेल्या RE/WE 125 बाइकवरुन प्रेरित आहे. या बाइकची फ्लाईंग फ्ली म्हणूनही ओळख आहे. जगभरात या बाइकचे रॉयल एनफिल्ड फक्त एक हजार युनिट्स तयार करणार आहे. याचा अर्थ हे अत्यंत लिमिटेड एडिशन मॉडल असणार आहे. यामधील १९० युनिट्स एकट्या ब्रिटनमध्ये विकले जाणार आहेत.

पेगाससची किंमत ४,९९९ ब्रिटीश पाऊंड्स म्हणजे जवळपास ४.५ लाख रुपये असणार आहे. जुलैपासून बुकिंगला सुरुवात होईल. भारतामध्ये या बाइकची काय किंमत असणार आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही. भारतात एकूण २५० युनिट्स विकले जाणार आहेत.

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पेगासस मॉडेल दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. यामधील मिलिट्री ओलिव्ह ग्रीन शेडला भारतात विकण्याची परवानगी मिळेल की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. या सर्व Classic 500 Pegasus एडिशन बुलेटला युनिक सिरियल नंबर देण्यात येईल, जो फ्यूएल टँकवर असेल.

Royal Enfield Classic 500 Pegasus लिमिटेड एडिशन मॉडेलमध्ये ४९९ सीसी, एअर कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात येईल. हे इंजिन ५२५० आरपीएमवर २७.२ बीएचपी पॉवर आणि ४००० आरपीएमवर ४१.३ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करेल. बाइकचा कर्ब वेट १९४ किलोग्राम आहे. सर्व मॉडेल्सवर ब्राऊन हॅण्डलबार ग्रिप्स, लेदर स्ट्रॅप, काळ्या रंगाचे सायलेन्सर, रिम्स, किकस्टार्ट लिव्हर आणि पेडल्स दिसतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2018 6:06 pm

Web Title: royal enfield classic 500 pegasus edition
Next Stories
1 असा ट्रान्सफर करा तुमचा भविष्य निर्वाह निधी
2 ज्वारी आणि बाजरीपासून बनवता येतात ‘हे’ हटके पदार्थ
3 जमाना यू ट्यूबचा…
Just Now!
X