Railway Recruitment 2020 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे इयत्ता दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. रेलवे भर्ती आयोगाने (आरआरसी) २७९२ अॅपरेंटिस जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून अर्ज मागवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरआरसीनं जारी केलेल्या जाहिरातीनुसार, पाच मार्चपासून या पदांसाठी अर्ज दाखल करू शकता. अर्ज करण्याची अखेरची तारीख चार एप्रिल आहे. विशेष म्हणजे, अॅपरेंटिस पदांसाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही. अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या आठवी/दहावी आणि आयटीआयमध्ये आलेल्या गुणांनुसार निवड करण्यात येणार आहे.

Good News : स्टाफ सिलेक्शनमधून भरणार ११५७ जागांची भरती

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय १५ ते २४ वर्ष असावं. तसेच उमेदवार दहावीची परीक्षा उतीर्ण झालेला असावा. दहावीसोबतच उमेदवार आयटीआयची परीक्षाही पास झालेला असावं. उमेदवारानं या परीक्षा कमीत कमी ५० गुणांसह उतीर्ण केलेल्या असाव्यात. एससी,एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही. जनरल आणि ओबीसी उमेदवारांना अर्जाचं शुल्क १०० रूपये असेल.

दरम्यान, केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली येणारी सहा लाख ८३ हजार पदं रिक्त आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, ही पदं भरण्याचा विचार केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. UPSC मार्फत ४३९९ आणि SSC मार्फत १३९९५ पदं केंद्र सरकार लवकरच भरणार आहे. मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच आरआरबी अंतर्गत १,१६,३९१ पदे भरली जाणार आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rrc er apprentice recruitment for 2792 posts application to begin today hiring without exam nck
First published on: 25-02-2020 at 14:36 IST