News Flash

हा आहे जगातील सर्वात महाग आयफोन; किंमत वाचून व्हाल हैराण

कॅविअर या कंपनीनं हा मोबाईल डिझाईन केला आहे.

फोटो सौजन्य : कॅविअर

जगातील सर्वात महागड्या iPhone ची एन्ट्री झाली आहे. हा कोणत्याही प्रकारचा नवा iPhone नाही.  iPhone 11 Pro या फोनला मॉडिफाय आणि रिडिझाईन करण्यात आलं आहे. रशियन कंपनी Caviar ने या iPhone च्या डिझाईनमध्ये बदल केले आहेत. हे नवं डिझाईन गेल्या वर्षी Elon Musk च्या Tesla द्वारे लाँच करण्यात आलेल्या Cybertruck पासून प्रेरित होऊन तयार केलेला आहे. या आयफोनची किंमत तब्बल ९३ लाख रूपये इतकी असू शकते.

कॅविअर ही कंपनी सोनं आणि हिऱ्यांच्या मदतीनं गॅजेट्सना रिडिझाईन करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. लाखो रूपये खर्च करून हायटेक गॅजेट्स खरेदी करणाऱ्या श्रीमंतांसाठी ही कंपनी गॅजेट्सना रिडिझाईन करत असते. यावेळी कंपनीनं iPhone 11 Pro ला रिडिझाईन केलं आहे. यापूर्वी कंपनीनं स्मार्टवॉच आणि टॅबदेखील रिडिझाईन केले होते.

टायटॅनिअम बॉडीचा वापर
या मोबाईलच्या सुरक्षेसाठी कंपनीनं यामध्ये टायटॅनिअम बॉडीचा वापर केला आहे. हा संपूर्ण फोन मेटल प्लेटने ढाकलेला असल्याचं आपल्याला पहायला मिळतं. हा फोन हातून पडला तरी या फोनला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. तर वापर करताना फोनच्या आऊटर शेलला फोल्ड करता येऊ शकते. फोन वापरत असतानाही याचं आऊटर शेल फोल्ड करता येणं शक्य आहे. फोन पाहताक्षणीच हा मजबूत टेस्ला सायबरट्रक सारखा तयार करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं.

एक कोटी रूपयांच्या घरात किंमत
कॅविअर या कंपनीनं केवळ ९९ आयफोन ११ रिडिझाईन केले आहेत. या मोबाईलची किंमत किती असेल याबाबत मात्र कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. ज्यांना हे मोबाईल विकत घ्यायचा आहे, त्यांनाच या मोबाईलची किंमत सांगण्यात येईल, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यापूर्वी कंपनीनं अशाप्रकारे डिझाईन केलेल्या मोबाईलची किंमत ९३ लाखांपर्यंत होती. या फोनचीही किंमत एक कोटीच्या घरात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 11:52 am

Web Title: russian company cavier redesigned iphone 11 pro it is inspired by the look of the tesla cyberattruck jud 87
Next Stories
1 Honda ची नवीन Amaze लाँच, जाणून घ्या किंमत आणि खासियत
2 दररोज 5जीबीपर्यंत डेटा , BSNL चा खास प्लॅन
3 अन्न असुरक्षिततेमुळे मृत्यूच्या जोखमीत वाढ
Just Now!
X