22 November 2017

News Flash

जगातील सर्वात लांब पायांची मॉडेल

'मला नेहमीच न्यूनगंड वाटायचा'

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 3:35 PM

२००८ साली बिजिंगमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिने बॉस्केटबॉल खेळात रशियाचं प्रतिनिधित्त्व केलं होतं.

रशियन मॉडेल एकॅटेरिना लिसिना सध्या चर्चेत आहे. जगातील सर्वात लांब पाय असलेली महिला आणि मॉडेल म्हणून तिच्या नावाची नोंद ‘गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झालीय. पण कोणे एकेकाळी आपल्या पायांमुळे मोठा न्यूनगंड तिला होता.

तिचे लांब पाय पाहून कोणी ‘जिराफ’ तर कोणी ‘शिडी’ म्हणून तिची टेर खेचायचे. शाळेत तर अनेकदा ती मुलांच्या चेष्टेचा विषय होती. मुलांसोबत तिची नेहमीच भांडणं व्हायची. आपणच असे का? हा प्रश्न तिला सारखा पडायचा. पण हळहळू आपण जगापेक्षा वेगळे आहोत याची जाण तिला होऊ लागली. ६.९ फूट उंच असलेल्या एकॅटेरिनाची मॉडलिंग विश्वात चर्चा होऊ लागली. जगातील सर्वात लांब पाय असलेली महिला म्हणून तिची नुकतीच ‘गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झालीय. तिच्या पायांची लांबी १३२ सेंटीमीटर आहे.

वाचा : उंची वाढत नाहीये? हे आसन करुन पाहा…

२००८ मध्ये बिजिंगमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये तिने बॉस्केटबॉल खेळात रशियाचं प्रतिनिधित्त्व केलं होतं. यात तिने देशाला कांस्य पदकही जिंकून दिलं होतं. लांब पायांमुळे जरी तिच्या नावे विक्रम जमा झाला असला तरी या पायांमुळेच रोजच्या आयुष्यात वावरताना तिला अनेक अडचणींना समोरं जावं लागातंय. पायांमुळे विमानात किंवा गाडी बसतानाही तिला त्रास होतो. अनेकदा मापाच्या चप्पलाही मिळत नासल्याचं तिच म्हणणं आहे.

वाचा : उदमांजराच्या विष्ठेतील बियांपासून तयार होते महागडी कॉफी, किंमत माहितीये?

First Published on September 13, 2017 3:21 pm

Web Title: russian model ekaterina lisina hold guinness book of world record for longest leg
टॅग Ekaterina Lisina