दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीमधील अविभाज्य भाग असलेला खाद्यपदार्थ म्हणजे सांबार. इडली, डोसा, मेदूवडा या पदार्थांची नावं घेतली की सांबाराची आपोआपच डोळ्यासमोर येते. केवळ दक्षिणेतील लोकांच नाही तर जगभरातील खवय्यांना आपल्या चवीची भूरळ पाडणाऱ्या या सांबाराची ओळख जरी दाक्षिणात्य पदार्थ असली तरी या पदार्थाचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे यांचे वंशज असणाऱ्या शहाजी राजांचे चुलत बंधू संभाजी राजेंच्या नावावरून या पदार्थाचे नाव पडल्याचे लेखी पुरावेही आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासंदर्भातील माहिती भारतातील प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यानेच लाइफस्टाइल वाहिनीवरील ‘करीज ऑफ इंडिया’ कार्यक्रमात दिली आहे. खाद्यभ्रमंती तसेच पाककृतीसंदर्भातील अनेक कार्यक्रमांमुळे घराघरात पोहचलेला चेहरा म्हणजे कुणाल कपूर. मास्टशेफ इंडियाचा परिक्षक म्हणूनही कुणाल लोकप्रिय आहे. सांबाराबद्दल बोलताना कुणाल म्हणतो, ‘आज आपण तूरडाळ वापरून सांबार बनवतो. सांबार पहिल्यांदा कधी बनवला गेला यासंदर्भात अनेक कथा आहेत. मात्र सांबार हा पदार्थ पहिल्यांदा मराठ्यांच्या राजवटीमध्ये बनवण्यात आला. दक्षिणेमध्ये राज्य करत असलेल्या मराठ्यांनी हा खाद्यपदार्थ पहिल्यांदा बनवला आली त्याचा त्या काळचा राजा संभाजी यांच्या नावावरून या पदार्थाला सांबार हे नाव देण्यात आले.’ आज आपण तुरडाळ वापरून सांबार बनवत असलो तरी सर्वात पहिल्यांदा सांबार हा उडदाची डाळ वापरून बनवण्यात आला होता असेही कुणालने सांगितले. पुढे बोलताना तो म्हणतो, ‘त्यामुळे यापुढे कधीही तुम्ही एखाद्या दाक्षिणात्य उपहारगृहामध्ये सांबार खात असाल तर तुम्ही खरं म्हणजे एक मराठमोळा पदार्थ खाताय हे लक्षात ठेवा.’

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambar was named after sambhaji
First published on: 18-10-2018 at 11:59 IST