दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीने बुधवारी आपला शानदार स्मार्टफोन Galaxy A51 वर अनेक ऑफरची घोषणा केली आहे. एकूण पाच कॅमेरे असलेल्या या स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या मॉडेलवर ग्राहकांना आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत.

किंमत आणि ऑफर्स :-
Galaxy A51 या स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 27,999 रुपये आहे. तर, 6 जीबी रॅम मॉडेलची किंमत 25,250 रुपये आहे. ऑफरनुसार, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि एसबीआय क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास 1500 रुपये कॅशबॅक मिळेल. याशिवाय Galaxy A51 खरेदी करणाऱ्या युजर्सना 1,500 रुपये अपग्रेड बोनसही मिळू शकतो. नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील ठेवण्यात आला आहे. कंपनीकडून या फोनवर 30 जूनपर्यंत Samsung Care+ ची ऑफरही आहे. या ऑफरमध्ये अॅक्सीडेंटल डॅमेज आणि लिक्विड डॅमेज पॅकेज 1099 आणि 699 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन ऑफलाइन स्टोअर्स, सॅमसंगची अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स पोर्टलद्वारे खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन प्रिज्म क्रश ब्लॅक, प्रिज्म क्रश व्हाइट आणि प्रिज्म क्रश ब्लू अशा तीन कलर्सच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

Galaxy A51 के स्पेसिफिकेशन्स :-
सॅमसंगच्या या फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ सुपर AMOLED इन्फिनिटी-O डिस्प्ले आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असलेल्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर Exynos 9611 प्रोसेसर देण्यात आलं आहे. फोनमध्ये 8 जीबीपर्यंत रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज असून माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. याशिवाय फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एक 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित OneUI 2.0 वर कार्यरतस असून यात फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.