ऑनलाईन कंपन्या कायमच आपल्या ग्राहकांना आकर्षित कऱण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर देत असतात. त्यामुळे ग्राहकांचाही फायदा होतो आणि कंपनीचाही. फ्लिपकार्ट कंपनीने नुकतीच अशीच एक ऑफर जाहीर केली असून यंदा सॅमसंगच्या वेगवेगळ्या उत्पादनांवर या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. फ्लिपकार्टचा नुकताच झालेला बिग १० सेलची संधी जर तुमच्याकडून सुटली असेल तर आताच्या ऑफरचा लाभ तुम्ही घेऊ शकता. यामध्ये टीव्हीपासून मोबाईलपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. १३ जून ते १५ जून या कालावधीत या सॅमसंग कार्निव्हलचे आयोजन करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

सिटीबॅंकचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असेल तर १० टक्क्यांची अतिरिक्त कॅशबॅक ऑफर देण्यात येणार आहे. यामध्ये सॅमसंग गॅलॅक्सी सी ९ प्रो, सॅमसंग गॅलॅक्सी ऑन नेक्स्ट, गॅलॅक्सी ऑन ८ यांसारख्या अनेक मोबाईलवर आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. यामध्येही गॅलॅक्सी सी ९ प्रोला सर्वाधिक मागणी असण्याची शक्यता आहे. या मोबाईलवर ५ हजारांची सूट मिळणार असून तो ३१,९०० रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय १५ हजार रुपयांची एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. सॅमसंग ऑन नेक्स्ट हा ६४ जीबींचा मोबाईल १४,९०० रुपयांत तर ३२ जीबीचा मोबाईल १३९०० रुपयांत घेता येणार आहे.

याशिवाय गॅलॅक्सी जे५ या फोनवर १ हजार रुपयांची सूट देण्यात आली असून तो ९९९० रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर नो कॉस्ट ईएमआय ऑफर देण्यात आली असून ९ हजारपर्यंत एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. याशिवाय गॅलॅक्सी जे३ प्रो मोबाईलवर ७९९० रुपयांत विकत घेता येणार आहे. ७५०० रुपयांची इएमआय ऑफर देण्यात आली आहे. गॅलॅक्सी ऑन ८ हा फोन १२ ४९० रुपयांना उपलब्ध आहे.

याबरोबरच सॅमसंगच्या स्मार्ट विअरेबलवर आणि टीव्हीवरही अतिशय चांगल्या आणि ग्राहकांच्या फायद्याच्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. फ्लिपकार्टवर या टीव्हींना जवळपास ५० टक्के सूट मिळत आहे.