18 January 2019

News Flash

सॅमसंग कार्निवलला सुरूवात , स्मार्टफोनवर 12 हजारापर्यंत सूट

१२ ते १४ जून म्हणजे ३ दिवस हा कार्निवल सुरू असेल

फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर सॅमसंग कार्निवलची पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. १२ ते १४ जून म्हणजे ३ दिवस हा कार्निवल सुरू असेल. या कार्निवलमध्ये गॅलेक्सी एस-8, गॅलेक्सी एस-8+, गॅलेक्सी ऑन नेक्स्ट आणि गॅलेक्सी जे 3 प्रो या स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एस-8+ या फोनवर कार्निवलमध्ये 10 हजार रुपयांची सूट मिळत आहे, त्यामुळे हा फोन 43 हजार 990 रुपयांत खरेदी करता येईल. तर Samsung Galaxy S8 या फोनवर 12 हजार रुपयांची सूट आहे. 37 हजार 990 रुपयांमध्ये हा फोन येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ऑन नेक्स्ट 64 जीबी व्हेरिअंटवर 7 हजार रुपयांची सूट मिळत आहे, त्यामुळे हा फोन कार्निवलमध्ये 10 हजार 900 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर 2 हजार 9 रुपयांची सूट मिळाल्याने सॅमसंग गॅलेक्सी ऑन नेक्स्ट 16 जीबी व्हेरिअंट 8 हजार 990 रुपयांत उपलब्ध आहे. याशिवाय सॅमसंगचा लोकप्रिय फोन स्मार्टफोन गॅलेक्सी जे 3 वर १८ रुपयांची सूट आहे, त्यामुळे हा फोन 6 हजार 690 रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी ऑन 5 या फोनवर 2 हजार 991 रुपयांची सूट आहे, त्यामुळे हा फोन 5 हजार 999 रुपयांत खरेदी करता येईल.

स्मार्टफोनशिवाय सॅमसंगच्या टीव्ही , फ्रिज यांसारख्या उपकरणांवरही सूट देण्यात आली आहे.

First Published on June 12, 2018 2:17 pm

Web Title: samsung carnival started on flipkart discount upto 12 thousand on smart phone