26 January 2021

News Flash

Samsung ने 17 मेपर्यंत वाढवली ‘ती’ ऑफर; एसी, फ्रिज-टीव्हीवर ‘बंपर’ कॅशबॅक

लॉकडाउनमध्ये प्री-बूकिंगसाठी भन्नाट ऑफर...

(PC : samsung.com)

सॅमसंग कंपनीने त्यांची  Stay Home, Stay Happy ही ऑफर 17 मे पर्यंत वाढवली आहे. ग्राहकांकडून वाढत्या मागणीमुळे गेल्या आठवड्यात आणलेली ही ऑफर कंपनीने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनमध्ये ज्यांना टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशिन किंवा अन्य उपकरण खरेदी करायचे असेल अशा ग्राहकांसाठी कंपनीने ही प्री-बूकिंग ऑफर गेल्या आठवड्यात आणली होती. ती आता 17 मेपर्यंत असणार आहे.

सॅमसंग कंपनी Stay Home, Stay Happy या ऑफरअंतर्गत आपल्या अनेक प्रोडक्ट्सवर बंपर कॅशबॅक देत आहे. ऑफरची घोषणा केल्यापासून सर्वाधिक 75 टक्के मागणी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि गुजरात या राज्यांमधून असल्याचं कंपनीने नमूद केलंय. त्यातही ग्राहकांची सर्वाधिक मागणी फ्रिजसाठी आहे. सर्वाधिक 37 टक्के बूकिंग फ्रिजसाठी तर टीव्हीसाठी 21 टक्के बूकिंग झाले आहे. त्यानंतर मायक्रोवेव्ह्ज,  एसी आणि वॉशिंग मशिनची मागणी असल्याचं कंपनीने सांगितलं. ही ऑफर आधी कंपनीने 8 मेपर्यंत ठेवली होती. पण आता ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने 17 मे पर्यंत ही ऑफर असेल. जाणून घेऊया ऑफर :- 

17 मे पर्यंत सॅमसंगचे कोणतेही उपकरण बूक करणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीची ही ऑफर आहे. युजर सॅमसंगच्या ऑनलाइन इ-शॉपमधून (https://www.samsung.com/in/offer/online/ce-sale/) प्रोडक्ट्स प्री-बूक करु शकतात. बूक केलेल्या कोणत्याही प्रोडक्टवर ग्राहकांना 15 टक्के कॅशबॅकची ऑफर दिली जात आहे. पण, ही ऑफर केवळ एचडीएफसीच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरच आहे. मात्र, याव्यतिरिक्तही कंपनीच्या अनेक ऑफर आहेत. प्रोडक्ट्सच्या खरेदीवर ग्राहकांच्या सोयीसाठी नो-कॉस्ट इएमआय, 18 महिन्यांपर्यंत लॉन्ग टर्म फायनान्सचा पर्यायही ठेवला आहे. सॅमसंग टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक वर्ष अतिरिक्त वॉरंटी आणि 30 दिवस ZEE5 प्रीमियमची मोफत मेंबरशीप मिळेल. याशिवाय ओव्हन आणि अन्य प्रोडक्ट्सवरही आकर्षक सूट आहे. त्याबबातची सविस्तर माहिती वेबसाअटवर देण्यात आली आहे. प्रशासनाकडून लॉकडाउनचे निर्बंध हटवल्यानंतर लगेच ग्राहकांना वस्तूंची डिलिव्हरी दिली जाईल असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 4:26 pm

Web Title: samsung extends stay home stay happy pre book offers till may 17 know all details sas 89
Next Stories
1 Piaggio ने भारतात लॉन्च केल्या दोन नवीन स्कूटर, किंमत किती?
2 ‘शाओमी’चं भन्नाट डिव्हाइस… Mi Box 4K खरेदी करण्याची अजून एक संधी
3 स्थलांतरित मजुरांना अन्न मिळावं म्हणून ही ८५ वर्षांची आजी १ रुपयाला विकते इडली
Just Now!
X