स्मार्टफोनप्रेमी २०१९ मध्ये टेक्नोलॉजीच्या जगात आता 5G सोबत फोल्डेबल स्मार्टफोनची वाट पाहत आहेत. मोबाइल क्षेत्रातील अग्रेसर कंपनी असलेली सॅमलंग कपनी लवकरच आपला फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. २० फेब्रुवारी रोजी फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे.

नव्या वर्षाच्या सुरूवातीला सॅमसंग कंपनीने आपल्या या फोनचा लूक जाहीर केला होता. या फोल्डेबल फोनला Galaxy F सिरीजच्या नावाने लाँच करणार असल्याचे बोलले जात आहे. सॅमसंगच्या या फोल्डेबल फोनला बाजारातील इतर कंपन्या टक्कर देण्याची शक्यता आहे. सॅमसंगने या डिव्हाइसबद्दल अद्याप काहीही सांगितलेले नाही. पण असे म्हटले जाते की त्या दिवशी सॅमसंग गॅलेक्सी एस 10 सह गॅलक्सी एफ किंवा गॅलेक्सी फ्लेक्स देखील लॉन्च करेल.

कसा असेल फोन –
या फोनला असणाऱ्या २ बॅटरी २२०० मिली अॅम्पियर्सच्या असतील असे म्हटले जात आहे. या फोनमध्ये दोन डिस्प्ले असतील. स्मार्टफोनची एक स्क्रीन आतल्या बाजूला तर दुसरी बाहेरच्या बाजूला असेल. डिस्प्ले प्राथमिक 7.3 इंच आहे आणि दुय्यम 4.58 इंचाचा आहे. या फोल्डएबल स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर, 10 जीबी रॅम असू शकेल.