News Flash

2000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा जबरदस्त स्मार्टफोन, मिळेल पाच कॅमेऱ्यांसह 6GB रॅम + 5,000mAh बॅटरी

स्वस्त झाला Samsung चा शानदार स्मार्टफोन, लाँच झाल्यापासून कंपनीने दुसऱ्यांदा केली किंमतीत कपात

Samsung Galaxy A31 ची किंमत 2,000 रुपयांनी कमी झाली आहे. लाँच झाल्यापासून दुसऱ्यांदा कंपनीने या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी ए31 हा फोन भारतात जूनमध्ये लाँच केला होता. हा फोन प्रिज्म क्रश ब्लॅक, प्रिज्म क्रश ब्लू आणि प्रिज्म क्रश व्हाइट अशा तीन रंगांच्या पर्यायासह आणि एकाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये चार रिअर कॅमेरे, मीडियाटेक हीलियो पी65 प्रोसेसर आणि 5,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

(पुढील वर्षापासून नाही खरेदी करता येणार Samsung चे ‘हे’ लोकप्रिय स्मार्टफोन्स! कारण…)

Samsung Galaxy A31 specifications :-
ड्युअल-सिम सपोर्ट असलेला हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित One UI वर कार्यरत आहे. यामध्ये 6.4 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सेल) इन्फिनिटी-यू डिस्प्ले असून मीडियाटेक हीलियो पी65 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेला हा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल. 512 जीबीपर्यंत माइक्रोएसडी कार्डचा सपोर्टही फोनला आहे. याशिवाय फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप असून यातील 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तर पुढील बाजूला सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A31 किंमत :-
सॅमसंग गॅलेक्सी ए31 या फोनची लाँचिंगवेळी किंमत 21,999 रुपये होती, पण दोनवेळेस किंमतीत कपात झाल्यानंतर आता हा फोन 17,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही किंमत 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे. फोन अॅमेझॉन इंडिया आणि सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर नव्या किंमतीसह उपलब्ध झाला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 12:58 pm

Web Title: samsung galaxy a31 price cut in india check new price and specifications sas 89
Next Stories
1 आता कारच्या पुढील दोन्ही सीटसाठी Air Bag देणं बंधनकारक? ‘या’ तारखेपासून लागू होऊ शकतो नवा नियम
2 Microsoft ने तब्बल 130 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतली Sony कंपनी? जाणून घ्या काय आहे सत्य?
3 करोनाचे दीर्घकालीन परिणाम
Just Now!
X