News Flash

अजून स्वस्त झाला Samsung Galaxy A31, कंपनीने केली किंमतीत कपात

आता स्वस्तात खरेदी करा पाच कॅमेऱ्यांसह 6GB रॅम + 5,000mAh बॅटरीचा दमदार स्मार्टफोन

Samsung Galaxy A31 ची किंमत पुन्हा एकदा कमी झाली आहे. कंपनीने गेल्या वर्षी लाँच झालेल्या या दमदार स्मार्टफोनच्या किंमतीत पुन्हा एकदा कपात केली आहे. दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी ए31 हा फोन भारतात जूनमध्ये लाँच केला होता. नंतर डिसेंबर महिन्यात कंपनीने या फोनच्या किंमतीत २००० रुपयांची कपात केली होती. त्यानंतर आता पुन्हा एक हजार रुपयांनी हा फोन स्वस्त झालाय. Samsung Galaxy A31 फोन प्रिज्म क्रश ब्लॅक, प्रिज्म क्रश ब्लू आणि प्रिज्म क्रश व्हाइट अशा तीन रंगांच्या पर्यायासह आणि एकाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये चार रिअर कॅमेरे, मीडियाटेक हीलियो पी65 प्रोसेसर आणि 5,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy A31 specifications :-
ड्युअल-सिम सपोर्ट असलेला हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित One UI वर कार्यरत आहे. यामध्ये 6.4 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सेल) इन्फिनिटी-यू डिस्प्ले असून मीडियाटेक हीलियो पी65 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेला हा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल. 512 जीबीपर्यंत माइक्रोएसडी कार्डचा सपोर्टही फोनला आहे. याशिवाय फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप असून यातील 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तर पुढील बाजूला सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A31 किंमत :-
सॅमसंग गॅलेक्सी ए31 या फोनची लाँचिंगवेळी किंमत 21,999 रुपये होती, पण यापूर्वी डिसेंबरमध्ये कंपनीने फोनच्या किंमतीत दोन हजार रुपयांची कपात केली होती. त्यानंतर आता पुन्हा याची किंमत एक हजार रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे आता हा फोन 16,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही किंमत 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे. फोन अॅमेझॉन इंडिया आणि सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर नव्या किंमतीसह उपलब्ध झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2021 4:32 pm

Web Title: samsung galaxy a31 price cut in india check new price specifications sas 89
Next Stories
1 JioFiber ची भन्नाट ऑफर, ‘या’ प्लॅनमध्ये एक महिना एक्स्ट्रा व्हॅलिडिटी
2 20 हजारांहून कमी किंमतीत आला OPPO F19, मिळेल 48MP कॅमेरा + 5000mAh बॅटरी
3 Redmi Note 10 : स्वस्त फोनच्या ‘सेल’ची वाट बघण्याची गरज नाही, आता कधीही करता येणार खरेदी
Just Now!
X