आघाडीची टेक कंपनी सॅमसंगने अलिकडेच ग्लोबल मार्केटमध्ये आपले तीन नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A52, Galaxy A52 5G आणि Galaxy A72 लाँच केले होते. आता यातील दोन स्मार्टफोन कंपनीने भारतातही उपलब्ध केले आहेत. सॅमसंग Galaxy A52 आणि Galaxy A72 हे दोन फोन भारतात लाँच झाले आहेत. सॅमसंगने गॅलेक्सी ए52 हा फोन 5जी मॉडेलमध्ये भारतात लाँच केला नाहीये. दोन्ही फोनला वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफसाठी IP67 रेटिंग मिळाली आहे. शिवाय दोन्ही फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्लेचा वापर करण्यात आला असून डॉल्बी ऑडिओचाही सपोर्ट आहे.

Samsung Galaxy A52, Galaxy A72 ची किंमत
Samsung Galaxy A52 ची भारतात किंमत 26 हजार 499 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत फोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची आहे. तर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 27 हजार 999 रुपये आहे. दुसरीकडे, Samsung Galaxy A72 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलला 34 हजार 999 रुपयांत भारतात उपलब्ध करण्यात आले आहे. तर, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 37 हजार 999 रुपये आहे. ऑसम ब्लॅक(Awesome Black), ऑसम ब्लू (Awesome Blue), ऑसम व्हाइट (Awesome White) आणि ऑसम व्हॉयलेट (Awesome Violet) अशा चार रंगांमध्ये हे दोन्ही फोन लाँच झाले आहेत. लाँचिंग ऑफरअंतर्गत Samsung Galaxy A52 च्या खरेदीवर HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर 2,000 रुपये कॅशबॅकची ऑफर आहे. तर, Galaxy A72 च्या खरेदीवर 3,000 रुपये कॅशबॅकची ऑफरचा लाभ मिळेल.

Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
Electric Cycle
Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल
when woman walk on china streets wearing red saree
जेव्हा भारतीय तरुणी चीनमध्ये सुंदर लाल साडी नेसून फिरते… चिनी लोक पाहतच राहिले; पाहा व्हायरल व्हिडीओ

Samsung Galaxy A52 स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A52 मध्ये अँड्रॉइड 11 वर आधारित One UI 3.1 चा सपोर्ट असून 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड इन्फिनिटी ओ डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. याशिवाय 8 जीबी रॅम आणि 256 जीबीपर्यंत स्टोरेज आहे. मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येणंही शक्य आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये मागील बाजूला क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील 64 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे, तर अन्य तीन कॅमरे अनुक्रमे 12 मेगापिक्सेल (अल्ट्रा वाइड), 5 मेगापिक्सेल (डेफ्थ) आणि 5 मेगापिक्सेल (मॅक्रो) लेन्ससह आहेत. तर, सेल्फीसाठी यात 32 मेगापिक्सेलचा कॅमेराही आहे. याशिवाय फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, टाईप-सी चार्जिंग पोर्ट असून 15W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4500mAh क्षमतेची बॅटरी फोनमध्ये आहे.

Samsung Galaxy A72 स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्येही अँड्रॉइड 11 आधारित One UI 3.1 चा सपोर्ट असून 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले आहे. या फोनमध्येही ऑक्टाकोर प्रोसेसर, 8 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत स्टोरेज आहे, शिवाय स्टोरेज मेमरी कार्डने वाढवण्याचा पर्यायही आहे. या फोनमध्येही मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे. तर अन्य तीन कॅमेरे अनुक्रमे 12 मेगापिक्सेल (अल्ट्रा वाइड), 5 मेगापिक्सेल (मॅक्रो) आणि चौथा 8 मेगापिक्सेल (टेलीफोटो ) लेन्ससह आहेत. याशिवाय सेल्फीसाठी यात 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा कंपनीने दिलाय. याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, जीपीएस, टाईप-सी पोर्ट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असे फिचर्स आहेत. फोनमध्ये 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000mAh ची बॅटरीही दिली आहे.