25 January 2021

News Flash

2,000 रुपयांनी स्वस्त झाले Samsung चे दोन जबरदस्त स्मार्टफोन, कंपनीकडून किंमतीत कपात

Samsung ने केली दोन जबरदस्त 'मिडरेंज' स्मार्टफोनच्या किंमतीत कपात

Samsung कंपनीने आपल्या दोन मिडरेंज स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीचे Galaxy A71 आणि Galaxy A51 हे दोन स्मार्टफोन आता स्वस्त झाले आहेत.कंपनीने दोन्ही फोनच्य किंमतीत 2,000 रुपयांची कपात केली आहे. नवीन किंमतीसह दोन्ही फोन सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट झाले आहेत.

Samsung Galaxy A71 फिचर्स :
या फोनला अँड्रॉइड 10 चा सपोर्ट असून चार रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सरसह 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 5 मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ, जीपीएस आणि युएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट मिळेल. याशिवाय फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असून फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये ड्युअल सिमकार्डच्या सपोर्टसह अँड्रॉइड 10 चा सपोर्टही आहे. तसेच स्नॅपड्रॅगन 730 ऑक्टाकोर प्रोसेसर असून 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अॅमोलेड डिस्प्ले आहे.

Galaxy A51 के स्पेसिफिकेशन्स :-
सॅमसंगच्या या फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ सुपर AMOLED इन्फिनिटी-O डिस्प्ले आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असलेल्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर Exynos 9611 प्रोसेसर देण्यात आलं आहे. फोनमध्ये 8 जीबीपर्यंत रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज असून माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. याशिवाय फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एक 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित OneUI 2.0 वर कार्यरतस असून यात फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन प्रिज्म क्रश ब्लॅक, प्रिज्म क्रश व्हाइट आणि प्रिज्म क्रश ब्लू अशा तीन कलर्सच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

आणखी वाचा- स्वस्त झाले Poco चे दोन शानदार स्मार्टफोन, Poco M2 आणि Poco C3 च्या किंमतीत झाली कपात

Samsung Galaxy A71 नवीन किंमत :
किंमतीत झालेल्या कपातीनंतर Samsung Galaxy A71 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 27,499 रुपये झाली आहे. यापूर्वी याची किंमत 29 हजार 499 रुपये होती.

Samsung Galaxy A51 नवीन किंमत :
तर, किंमतीत कपात झाल्याने Samsung Galaxy A51 च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 20 हजार 999 रुपये झाली आहे. तर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 22 हजार 499 रुपये झाली आहे. यापूर्वी दोन्ही मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 22 हजार 999 रुपये आणि 24 हजार 499 रुपये होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2021 2:53 pm

Web Title: samsung galaxy a71 and galaxy a51 price cut in india by rs 2000 check new price and specifications sas 89
Next Stories
1 Maruti च्या चाहत्यांसाठी ‘बॅड न्यूज’, कंपनीने रद्द केली ‘या’ कारची लाँचिंग
2 स्वस्त झाले Poco चे दोन शानदार स्मार्टफोन, Poco M2 आणि Poco C3 च्या किंमतीत झाली कपात
3 सावधान! आरोग्य मंत्रालयाने CoWIN App बाबत दिली महत्त्वाची माहिती, तुम्हीही करत नाहीयेना ‘ही’ चूक
Just Now!
X