भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या सॅमसंग कंपनी लवकरच आपला आणखीन एक बजेट फोन बाजारात आणणार आहे. मूळ दक्षिण कोरियाची असलेल्या या कंपनीने अतिशय कमी वेळात भारतीय बाजारपेठेत स्थान पटकावले आहे. ठराविक कालावधीने ग्राहकांसमोर नवनवीन फिचर्सचे स्मार्टफोन सादर करत सॅमसंग आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. बाजारात विविध कंपन्यांमध्ये सुरु असलेल्या स्पर्धकांना तोंड देण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी A8s स्मार्टफोन लॉन्च केला आहे. मात्र, भारतात या फोनची विक्री अद्याप सुरु झालेली नाही. या महिन्याच्या अखेरीस हा फोन ग्राहकांना उपलब्ध होईल. ३१ डिसेंबरपासून चीनमधील एका वेबसाईटच्या माध्यमातून या फोनची खरेदी करता येणार आहे. चीनमध्ये या फोनची प्री-बुकिंग सुरु झाली आहे. या फोनचे प्री-बुकिंग JD.com वेबसाईटवर तो उपलब्ध आहे.

सॅमसंग गॅलेक्सी A8s हा अतिशय आकर्षक फोन असून त्यामध्ये ३ रिअर कॅमेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात २४ मेगापिक्सल, १० मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचे कॅमेरे देण्यात आले आहेत. ६ जीबी रॅम असलेल्या फोनच्या प्री-बुकिंगला सुरुवात करण्यात आली आहे. चीनमध्ये गॅलेक्सी A8s स्मार्टफोनची किंमत चिनी २९९९ युआन आहे. परंतु, भारतात या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या स्मार्टफोनचा डिस्प्ले ६.२ असा फुल एचडी असणार आहे. तसेच स्मार्टफोनमधील स्टोअरेज १२८ जीबी असून, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबीपर्यंत तो वाढवता येऊ शकतो. तसेच स्मार्टफोनला फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनची बॅटरीची क्षमता ३४०० एमएएच आहे, तसेच तो अतिशय वेगाने चार्ज होतो.