तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सध्या दर दिवसाला नवीन तंत्रज्ञानाचा मोबाईल बाजारात उपलब्ध होत आहे. सँमसंग कंपनीही यामध्ये मागे नाही. सुरुवातीला फिचर फोन त्यानंतर मागच्या काही वर्षांत स्मार्टफोनचे प्रमाण वाढले. नवनवीन फोन सादर करण्याबरोबरच विविध ऑफर्स देत आपल्या ग्राहकांना खूश करण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून केला जातो. सॅमसंगने नुकतीच आपली अशीच एक ऑफर जाहीर केली असून यामध्ये कंपनीच्या एका गाजणाऱ्या मॉडेलची किंमत कमी करण्यात आली आहे. यातही ही किंमत थोडीथोडकी नाही तर तब्बल ६ हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आता हे कोणते मॉडेल आहे ज्याची किंमत इतकी कमी केली, तर तो फोन आहे Samsung Galaxy C 7 Pro. किंमत कमी केल्याने ग्राहकांना हा फोन आता २१,९०० रुपयांना खरेदी करता येणार आहे.

मागच्या वर्षी लाँच झालेल्या या स्मार्टफोनची किंमत स्मार्टफोनची किंमत कंपनीने २७,९९० रुपये इतकी जाहीर केली होती. हा फोन बाजारात उपलब्ध असून ऑनलाइनही त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. अॅमेझॉन इंडिया एक्सक्लुझिव्ह राईटअंतर्गत या फोनची विक्री होत आहे. या ६ हजारांच्या डिस्काऊंटसह पेटीएमवरुन हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना आणखी २५०० रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफरही मिळणार आहे. Samsung Galaxy C 7 Pro हा फोन Galaxy C 9 Pro या फोनशी मिळताजुळता आहे. Galaxy C 7 Pro हा हँडसेट 6.01 मार्शमेलोवर चालतो. यात ५.७ इंचाचा १०८० पिक्सेल रेझोल्युशन एमोलेड डिस्प्ले आहे. यात २.२ गिगाहर्टझ ओक्टा कोर स्नॅपड्रॅगन ६२६ चिपसेटसह ४ जीबी रॅम आहे. काही दिवसांपूर्वी हा फोन बाजारात २४,९९० रुपयांना मिळत होता. मात्र आता कंपनीने याची किंमत आणखी कमी केलीये.

बारीक आणि मेटल बॉडीमुळे हा फोन अतिशय आकर्षक दिसत आहे. फोनमध्ये फ्रंट आणि रिअर कॅमेरासाठी १६ मेगापिक्सेलचा सेन्सर देण्यात आलाय. याचे वजन १७२ ग्रॅम आहे. स्मार्टफोनची बॅटरी ३३०० मिलीअॅम्पियर्सची असून तो अगदी कमी वेळात चार्ज होतो. याशिवाय Galaxy C 7 Pro मध्ये ऑल्वेज ऑन डिस्प्ले आणि सॅमसंग पे फीचर देण्यात आले आहे. तसेच यामध्ये इनबिल्ट स्टोरेज ६४ जीबी असून त्याची मर्यादा २५६ जीबीपर्यंत वाढवता येणार आहे.