सॅमसंगचा पहिलावहिला ६ जीबी रॅम असणारा स्मार्टफोन C9 Pro च्या किंमतीत गेल्या चार महिन्यांत दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे, त्यामुळे हा फोन कमी किंमतीत भारतीय बाजारपेठेत उपलब्ध झाला आहे. ऐन दिवाळी तोंडावर असताना आणि स्मार्टफोन खरेदीकडे लोकांचा वाढता कल पाहून सॅमसंगने या फोनच्या किंमतीत २ हजार रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे हा फोन आता ई कॉमर्स साईट्स आणि सॅमसंगच्या स्टोअरमध्ये २९,९०० रुपयांना उपलब्ध होणार आहे. हा फोन लाँच करण्यात आला, तेव्हा त्याची किंमत ३६ हजार ९०० रुपये होती. जून महिन्यात C9 pro च्या किंमतीत ५००० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यामुळे जूनपासून हा फोन भारतीय बाजारपेठेत ३१ हजार ९०० रुपयांना उपलब्ध होता. आता या फोनमध्ये आणखी २००० हजारांची कपात केली असल्याची घोषण सॅमसंगने केली आहे. दिवाळ सणात स्मार्टफोनची खरेदी वाढते, त्यामुळे सॅमसंगने किंमती कमी केल्याचं म्हटलं जात आहे.

…म्हणून आयफोनची बॅटरी लवकर उतरते

सॅमसंगचे C9 Pro चे फीचर्स
– ६ GB रॅम आणि ४ GB इंटर्नल स्टोरेज
– २५६ GB एक्सपांडेबल मेमरी
– अँड्रॉईड ६.० मार्शमॅलो ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६५३ प्रोसेसर
– ६ इंचाचा डिस्प्ले
– १६ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, फेस डिटेक्शन, पॅनोरमा, एचडीआर आणि टच फोकस
– १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
– होम बटण आणि फिंगरप्रिंट सेन्सर
– ड्युएल सिम

वनप्लसचा मोबाईल वापरताय? हे माहिती करुन घ्या

जानेवारी महिन्यात सॅमसंगने हा फोन लाँच केला होता. सॅमसंगचा पहिला ६ जीबी रॅम असलेला फोन म्हणून त्याची ओळख असली तरी म्हणावा तेवढा प्रतिसाद C9 Pro ला लाभला नाही. जवळपास याच किंमतीत OnePlus 5 फोन उपलब्ध आहे. जून महिन्यात हा फोन लाँच करण्यात आला होता. त्यामुळे C9 Pro पेक्षाही अनेकांची OnePlus 5 ला पसंती मिळताना दिसून येत आहे.