तुम्ही जर एखादा नवीन बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आघाडीची मोबाइल कंपनी सॅमसंगने काही दिवसांपूर्वीच भारतात आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy F02s लाँच केला आहे.

Samsung Galaxy F02s किंमत :-
Samsung Galaxy F02s या फोनची बेसिक किंमत फक्त 8 हजार 999 रुपये आहे. फोनच्या 3GB रॅम +32B स्टोरेज व्हेरिअंटची ही किंमत आहे. तर, 4GB रॅम +64GB स्टोरेजची किंमत 9 हजार 999 रुपये ठेवली आहे. 9 हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये लाँच झालेल्या या फोनमध्ये कंपनीने 5000mAh बॅटरी व ट्रिपल रिअर कॅमेरा यांसारखे दमदार फिचर्स दिले आहेत. हा फोन डायमंड व्हाइट, डायमंड ब्लू आणि डायमंड ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये खरेदी करता येईल. ९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेपासून फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या अधिकृत संकेतस्थळावर पहिल्यांदा या फोनसाठी सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. जाणून घेऊया फिचर्स :-

Samsung Galaxy F02s फिचर्स :-
सॅमसंग गॅलेक्सी F02s मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ इन्फिनिटी-V डिस्प्ले आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेटचा सपोर्ट असून 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी इंटर्नल स्टोरेज अशा दोन पर्यायात हा फोन उपलब्ध असेल. गरजेनुसार स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवण्याचाही पर्याय आहे. हा फोन अंड्रॉइड 10 बेस्ड वनयूआय कोर कस्टम स्किनसह येतो. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सेल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ लेन्स असा सेटअप असेल. तर, फोनमध्ये सेल्फीसाठीही 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. याशिवाय फोनमध्ये कंपनीने 15W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली तब्बल 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही दिली आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, 3.5 एमएम ऑडियो जॅक आणि युएसबी टाइप-सी यांसारखे फिचर्स दिले आहे.