News Flash

6,000 रुपये डिस्काउंट; खरेदी करा 7000mAh बॅटरीचा Samsung Galaxy F62, ऑफर 7 मेपर्यंत

घसघशीत कॅश डिस्काउंटची ऑफर, मिळेल पंचहोल डिस्प्लेसोबत 64MP कॅमेऱ्यासह तब्बल 8 जीबी रॅम आणि क्वॉड कॅमेरा सेटअपही

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर 2 मेपासून Big Saving Days Sale सुरू झाला आहे. 7 मेपर्यंत हा सेल सुरू असेल. बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये युजर्स अनेक स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कमी किंमतीत आणि आकर्षक डिस्काउंटसह खरेदी करु शकतात. जर तुम्ही सॅमसंगचा पॉवरफुल बॅटरीचा Samsung Galaxy F62 हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यावरही घसघशीत डिस्काउंट आहे. सॅमसंगने फेब्रुवारी महिन्यातच भारतात तब्बल 7000mAh बॅटरी क्षमता असलेला Samsung Galaxy F62 हा मिडरेंज स्मार्टफोन लाँच केला आहे. Samsung Galaxy F62 मध्ये पंचहोल डिस्प्ले आहे. याशिवाय क्वॉड कॅमेरा सेटअप असून Exynos 9825 प्रोसेसर दिलं आहे. हे एक ऑक्टाकोर प्रोसेसर आहे.

काय आहे ऑफर?:-
फ्लिपकार्टच्या Big Saving Days सेलमध्ये Samsung Galaxy F62 या फोनवर 6,ooo रुपयांची घसघशीत सवलत मिळेल. तसं बघायला गेलं तर Samsung Galaxy F62 ची बेसिक किंमत 23 हजार 999 रुपये आहे. ही किंमत 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची आहे. पण सहा हजार रुपयांची सवलत मिळत असल्याने हा फोन तुम्हाला 17 हजार 999 रुपयांत खरेदी करता येईल. तर, या फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मॉडेलची मूळ किंमत 25 हजार 999 रुपये आहे. पण, कॅश डिस्काउंटची ऑफर असल्याने सेलमध्ये या मॉडेलची किंमतही 19 हजार 999 रुपये झाली आहे. याशिवाय Flipkart Smart Upgrade अंतर्गत फोन खरेदी करतेवेळी ग्राहकांनी क्रेडिट कार्ड किंवा Bajaj Finserv च्या ईएमआय कार्डद्वारे व्यवहार केल्यास या फोनवर 5400 रुपये डिस्काउंट मिळेल. याशिवाय फोनच्या खरेदीवर नो-कॉस्ट ईएमआय आणि कॅशबॅक सारख्या अन्य काही आकर्षक ऑफर्सही आहेत. त्यांचा फायदाही तुम्हाला फोन खरेदी करताना मिळू शकतो.

Samsung Galaxy F62 स्पेसिफिकेशन्स :-
Samsung Galaxy F62 फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्टसोबत अँड्रॉइड 11 आधारित One UI 3.1 आहे. फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळेल. याशिवाय फोनमध्ये ऑक्टाकोर Exynos 9825 प्रोसेसरही आहे. 8 जीबीपर्यंत रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनचं स्टोरेज मेमरी कार्डच्या मदतीने 1 टीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. हा फोन लेजर ब्लू, लेजर ग्रीन आणि लेजर ग्रे अशा तीन कलर्समध्ये उपलब्ध असेल. फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप अर्थात मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप असून त्यातील 64 मेगापिक्सलचा सोनी IMX682 सेन्सर मुख्य कॅमेरा आहे, तर दुसरा 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल, तिसरा 5 मेगापिक्सेल मॅक्रो आणि चौथा 5 मेगापिक्सेलचा डेफ्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे. रिअर आणि फ्रंट दोन्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते. शिवाय, फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, ब्लूटूथ v5.0, GPS/A-GPS, NFC, USB टाइप-सी पोर्ट आणि 3.5एमएम हेडफोन जॅक मिळेल. फोनमध्ये साइड माउंटेड पॉवर बटणमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसेच यामध्ये 25W फास्ट चार्जिंगसोबतच रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट असलेली तब्बल 7000mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 4:16 pm

Web Title: samsung galaxy f62 with rs 6000 off on flipkart big saving days sale check details sas 89
Next Stories
1 ‘या’ नवीन नावाने भारतात लाँच होणार PUBG Mobile India?
2 सेंड करण्याआधी ऐकता येणार व्हॉइस मेसेज, WhatsApp मध्ये येतंय नवीन फिचर
3 Corona Vaccine सेंटरची माहिती आता Whatsapp वर मिळवा, ‘या’ नंबरवर करा फक्त एक मेसेज
Just Now!
X