Samsung चा पहिला आणि बहुचर्चित फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Fold साठी पुन्हा एकदा प्री-बुकिंगला सुरूवात होत आहे. 11 ऑक्टोबर रोजी या फोनसाठी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे प्री-बुकिंग करता येईल. यापूर्वी कंपनीने 4 ऑक्टोबर रोजी हा स्मार्टफोन पहिल्यांदा प्री-बुकिंगसाठी उपलब्ध केला होता. त्यावेळी अवघ्या 30 मिनिटांमध्ये एकूण 1600 स्मार्टफोनची विक्री झाली होती. विशेष म्हणजे प्री-बुकिंगसाठी ग्राहकांना सर्व 1 लाख 64रुपये आगाऊ भरायचे होते. तरीही ग्राहकांचा शानदार प्रतिसाद याला मिळाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा 11 ऑक्टोबर रोजी हा फोन आगाऊ नोंदणीसाठी उपलब्ध असणार आहे.

यावेळी देखील नोंदणी करण्यासाठी संपूर्ण किंमत अर्थात 1 लाख 64 रुपये द्यावे लागणार आहेत. सॅमसंगच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 12 वाजेपासून फोनसाठी नोंदणी करता येईल. कंपनीकडून या फोनच्या खरेदीवर काही खास ऑफर देखील आहेत. हा फोन खरेदी करणाऱ्यांना कंपनीकडून एक वर्षाचा अपघाती विमा कव्हर वन टाइम प्रोटेक्शनसह मिळेल. गॅलेक्सी फोल्डच्या फ्लेक्स डिस्प्लेसाठी हे संरक्षण मिळेल. याद्वारे डिस्प्ले डॅमेज झाल्यास 10 हजार 500 रुपयांच्या सवलतीत डिस्प्ले रिप्लेस करता येईल. याशिवाय ग्राहकांना एक डेडिकेडेट हेल्पलाइन क्रमांकाचा (1800 20 7267864) अॅक्सेस मिळेल. या क्रमांकाद्वारे युजर्सना एक्सपर्टचा सल्ला मिळणार आहे.

आणखी वाचा- ‘बेस्ट सेलिंग स्मार्टफोन’च्या किंमतीत कपात, ‘ही’ आहे नवी किंमत

फीचर्स –
पहिला डिस्प्ले – 4.6 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले (840×1960 पिक्सल रिझोल्यूशन, आस्पेक्ट रेशियो 21:9)
दुसरा डिस्प्ले – 7.3 इंचाचा इनफिनिटी फ्लेक्स डायनॅमिक AMOLED पॅनल डिस्प्ले.
रिअर कॅमेरा – ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप (१६, १२ आणि १२ मेगापिक्सल क्षमता)
फ्रंट कॅमेरा – 10 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सचा ड्युअल कॅमेरा सेटअप
ऑपरेटिंग सिस्टिम – अँड्रॉइड 9 वर आधारित सॅमसंगच्या One UI वर कार्यरत
बॅटरी – 4,380mAh क्षमतेची बॅटरी
12 जीबी रॅम / 512 जीबी इंटरनल स्टोरेज (मायक्रो एसडी कार्डचा सपोर्ट नाही) प्रोसेसर – ऑक्टा-कोर एसओसी प्रोसेसर