17 January 2021

News Flash

अर्ध्या किंमतीत खरेदी करता येईल Samsung चा फोन, Galaxy Hours flash sale ला झाली सुरूवात

सॅमसंगच्या धमाकेदार Galaxy Hours flash sale ला झाली सुरूवात...

सॅमसंग कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी Galaxy Hours flash sale आणला आहे. या सेलमध्ये Galaxy Z Flip स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. Samsung.com वर कंपनीचा हा सेल आज दुपारी 12 वाजेपासून 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. पण, सेलमध्ये Galaxy Z Flip अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची संधी केवळ निवडक तीन जणांनाच मिळेल. याव्यतिरिक्त सेलमध्ये अन्य स्मार्टफोन, वेअरेबल्स, टॅबलेट्स आणि अ‍ॅक्सेसरीजवरही शानदार ऑफर्स आहेत. या ऑफर्सनुसार HDFC, ICICI आणि Citibank च्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे खरेदी करणाऱ्यांना 6 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅकची मिळेल. तसेच जुन्या स्मार्टफोनवर 8 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही आहे.

Galaxy Hours flash sale  मध्ये Galaxy Z Flip खरेदी करणाऱ्या तीन ‘लकी’ ग्राहकांना 50 टक्के कॅशबॅक मिळेल. याशिवाय फोन खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना एक वर्षासाठी वन-टाइम अ‍ॅक्सीडेंटल डॅमेज प्रोटेक्शन दिलं जाईल. तसेच ग्राहकांना झीरो कॉस्टवर गॅलेक्सी Assured प्लॅन दिला जाईल, यानुसार फोन परत करुन नवीन फोन खरेदी करताना 70 टक्क्यांपर्यंत ‘बायबॅक’ व्हॅल्यू मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी Z Flip :-
सॅमसंगच्या या फोल्डेबल स्मार्टफोनला 6.7 इंचाचा डाइनॅमिक AMOLED इन्फिनमिटी फ्लेक्स डिस्प्ले असून यात 1.1 इंचाचा सेकंडरी डिस्प्लेही आहे. 8 जीबी रॅम, 256 जीबी इंटर्नल स्टोरेज आणि स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये 12 +12 मेगपिक्सलचे ड्युअल रिअर कॅमेरा आणि 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 3300mAh क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये असून किंमत 108,999 रुपये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 12:17 pm

Web Title: samsung galaxy hours flash sale starts galaxy z flip and more phones available with discounts sas 89
Next Stories
1 कसा आहे मोटोरोलाचा ‘स्वस्त’ 5G स्मार्टफोन Moto G Plus? जाणून घ्या फीचर्स
2 टिकटॉकला पर्याय : आता इंस्टाग्रामने भारतात लाँच केलं Reels
3 काळे वाटाणे खाण्याचे असेही गुणकारी फायदे
Just Now!
X