21 January 2019

News Flash

सॅमसंगचा ३ कॅमेरांचा Galaxy J7 Duo दाखल

Galaxy J7 Duo असे या फोनचे नाव असून आजपासून हा फोन बाजारात खरेदीसाठी उपलब्ध असेल

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सध्या दर दिवसाला नवीन तंत्रज्ञानाचा मोबाईल बाजारात उपलब्ध होत आहे. सँमसंग कंपनीही यामध्ये मागे नाही. सुरुवातीला फिचर फोन होता. त्यानंतर मागच्या काही वर्षांत स्मार्टफोनचे प्रमाण वाढले. त्यातही रिअर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेराचे रिझोल्यूशन याबाबत ग्राहकांकडून विशेष विचारणा होऊ लागली. आता यामध्ये आणखी प्रगती झाली असून ३ कॅमेरा असणारा फोन बाजारात दाखल झाला आहे. Galaxy J7 Duo असे या फोनचे नाव असून आजपासून हा फोन बाजारात खरेदीसाठी उपलब्ध असेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये २ रियर कॅमेरा आणि १ फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

याहूनही आणखी एक खास गोष्ट म्हणजे हा फोन गुगलच्या नव्याने आलेल्या अँड्रॉइड सिस्टीम ओरियो ८.० वर काम करतो. हा फोन सध्या ब्लॅक आणि गोल्ड रंगात उपलब्ध आहे. या फोनची किंमत १६,९९० असून तो Redmi Note 5 Pro ला टक्कर देणार असल्याची चर्चा आहे. कारण या फोनलाही २ रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. हा फोन ४ जीबी आणि ६ जीबी अशा दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. अनुक्रमे या फोनची किंमत १३,९९९ रुपये आणि १६,९९९ रुपये आहे.

Galaxy J7 Duo फोनला ५.५ इंचाची एचडी स्क्रीन देण्यात आली असून १.६ गिगाहर्डजचा एक्सीनॉस ७ सिरीजचा ऑक्टा कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनला ४ जीबी रॅम देण्यात आली आहे. यामध्ये ३२ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. ही मेमरी २५६ जीबीपर्यंत वाढवता येते. या फोनला ३ हजार मिलीअॅम्पियर्सची बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेराबाबत बोलायचे झाले तर या फोनमधील एक रियर कॅमेरा १३ मेगापिक्सल आणि दुसरा ५ मेगापिक्सलचा आहे. फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे फेस अनलॉक फिचर आणि फिंगर प्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे.

First Published on April 12, 2018 1:39 pm

Web Title: samsung galaxy j7 duo launch in india it will compete with xiaomi redmi note 5 pro features specification