02 December 2020

News Flash

सॅमसंगचे दोन ‘बजेट’ स्मार्टफोन झाले अजून ‘स्वस्त’, कंपनीने केली किंमतीत कपात

दोन 'बजेट' स्मार्टफोनच्या किंमतीत कपात

सॅमसंग कंपनीने आपल्या दोन ‘स्वस्त’ स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीचे ‘एम’ सीरिजमधील Galaxy M01 आणि Galaxy M11 हे दोन स्मार्टफोन आता अजून स्वस्त झाले आहेत. किंमतीत झालेल्या कपातीनंतर Galaxy M11 च्या 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेजची किंमत 10 हजार 499 रुपये आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी मॉडेलची किंमत 11 हजार 999 रुपये झाली आहे. या दोन्ही व्हेरिअंटची किंमत यापूर्वी अनुक्रमे 10,999 रुपये आणि 12,999 रुपये होती. तर, Galaxy M01 हा स्मार्टफोन आता 7,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची ही किंमत आहे. लाँचिंगवेळी 8,999 रुपये इतकी Galaxy M01  ची किंमत होती.

Samsung Galaxy M11 स्पेसिफिकेशन्स :-
सॅमसंग गॅलेक्सी एम11 मध्ये 6.4 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसरचा सपोर्ट असून अँड्रॉइड 10 वर आधारित One UI 2.0 ऑपरेटिंग सिस्टिमवर हा फोन कार्यरत असतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. यातील 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 5 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल शूटर आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी गॅलेक्सी एम11 स्मार्टफोनमध्ये 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ व्हर्जन 4.2, जीपीएस, युएसबी पोर्ट टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक यांसारखे फीचर्स आहेत. याशिवाय फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000 एमएएच क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये आहे.

Samsung Galaxy M01 स्पेसिफिकेशन्स :-
या बजेट फोनमध्ये 5.7 इंचाचा एचडी+ इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले असून 4000mAh क्षमतेची बॅटरी आहे. फोनमध्ये 32 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे, पण माइक्रोएसडी कार्डद्वारे 512 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येते. या डिव्हाइसमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर फोनच्या मागे ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील 13 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. तर, 2 मेगापिक्सेलचा सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. या फोनमध्ये 4G VoLTE सपोर्टशिवाय जीपीएस/ए-जीपीएस एफएम रेडिओ यांसारखे फीचर्स आहेत. तर, कनेक्टिव्हिटीसाठी माइक्रो-युएसबी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 2:49 pm

Web Title: samsung galaxy m01 and galaxy m11 get price cut in india now start at rs 7999 check details sas 89
Next Stories
1 Samsung Galaxy Tab A7 भारतात लाँच, दोन महिन्यांसाठी फ्री YouTube प्रीमियम ; जाणून घ्या डिटेल्स
2 6,000mAh बॅटरी + 64 MP कॅमेरा ; Poco च्या ‘लेटेस्ट’ स्मार्टफोनचा पहिलाच ‘सेल’
3 World Heart Day 2020 : हृदयविकाराची भीती वाटते? मग समजून घ्या प्रमुख कारणे आणि प्रकार
Just Now!
X