सॅमसंगचा एक बजेट स्मार्टफोन आता स्वस्त झाला आहे. कंपनीचा एंट्री लेवल स्मार्टफोन Samsung Galaxy M11 स्वस्त झालाय. सॅमसंगने Galaxy M11 स्मार्टफोन गेल्या वर्षी जूनमध्ये लाँच केला होता.
मुंबईतील रिटेलर महेश टेलिकॉमने दिलेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy M11 च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत कपात झाली आहे. कंपनीने हा फोन 4GB रॅम व्हेरिअंटमध्ये 12 हजार 999 रुपयांत लाँच केला होता. किंमतीत कपात झाल्याने आता या फोनची किंमत 10 हजार 999 रुपये झालीये. जवळपास 2,000 रुपयांनी हा फोन स्वस्त झालाय. दरम्यान, सॅमसंगने अद्याप अधिकृतपणे किंमतीच्या कपातीची घोषणा केलेली नाही. 3 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत आधीप्रमाणेच 9 हजार 999 रुपये आहे.
#SamsungM11 4/64 New MOP ₹10999/- pic.twitter.com/lVveTVmKKD
— Mahesh Telecom (@MAHESHTELECOM) February 13, 2021
आणखी वाचा- 7,000mAh बॅटरीचा Samsung Galaxy F62 भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत-फिचर्स
Samsung Galaxy M11 स्पेसिफिकेशन्स :-
सॅमसंग गॅलेक्सी एम11 मध्ये 5.7 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसरचा सपोर्ट असून अँड्रॉइड 10 वर आधारित One UI 2.0 ऑपरेटिंग सिस्टिमवर हा फोन कार्यरत असतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. यातील 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 5 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल शूटर आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी गॅलेक्सी एम11 स्मार्टफोनमध्ये 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ व्हर्जन 4.2, जीपीएस, युएसबी पोर्ट टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक यांसारखे फिचर्स आहेत. याशिवाय फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000 एमएएच क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 16, 2021 12:59 pm