सॅमसंग कंपनीने आपल्या ‘एम’ सीरिजमधील स्मार्टफोन Galaxy M20 चा फ्लॅशसेल आयोजित केला आहे. आज(दि.28) दुपारी 12 वाजेपासून अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर या फोनसाठी फ्लॅशसेल सुरू झाला आहे. याशिवाय सॅमसंगच्या ई-शॉप संकेतस्थळावरही या फोनची विक्री सुरू आहे.

एकाहून एक बजेट स्मार्टफोन आणणाऱ्या शाओमीला टक्कर देण्यासाठी सॅमसंग कंपनीने नवी गॅलेक्सी M सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमधील पहिले दोन स्मार्टफोन Galaxy M10 आणि M20 यापूर्वीच लाँच झाले आहेत. त्यानंतर काल(दि.28) कंपनीने याच सीरिजमधील ट्रिपल रिअर कॅमेरा असलेला M30 हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे.

ऑफर – 

आजच्या फ्लॅशसेलमध्ये या स्मार्टफोनवर 1,199 रुपयांच्या एकूण डॅमेज प्रोटेक्शनसह नो-कॉस्ट इएमआयची ऑफर आहे. याशिवाय जिओचे युजर्स Jio Double Data ऑफरच्या अंतर्गत 3 हजार 110 रुपयांपर्यंतचा फायदा मिळवू शकतात.

फीचर्स –

M20 हा स्मार्टफोन 3GB + 32GB व्हेरिअंट आणि 4GB + 64GB अशा दोन प्रकारात सादर करण्यात आला आहे. अनुक्रमे 10 हजार 990 रुपये आणि 12 हजार 990 रुपये इतकी याची किंमत ठेवण्यात आली आहे. गॅलेक्सी एम20 मध्ये 6.2 इंच एचडी+डिस्प्ले (रिझोल्युशन 720X1520 पिक्सल) आणि वॉटरड्रॉप नॉच आहे. 4एमएम ऑक्टाकोर Exynos 7870 SoC प्रोसेसर यात देण्यात आलंय, तसंच अँड्रॉइड ओरिओ 9.1 प्रणालीवर हा कार्यरत असेल. यामध्ये 5 हजार एमएएचची बॅटरी आणि मायक्रो युएसबी पोर्ट आहे. तसंच 13+5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.